Mahendra Singh Dhoni Records in IPL : आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यात (IPL 2023) च्या चेन्नई सुपर किंग्स (CSK) गुजरात टायटन्सचा (GT) पराभव करत चॅम्पियन ठरला. हा सामना जिंकून चेन्नईनं (CSK) पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. गतविजेता गुजरात संघ यंदा अंतिम सामन्यात पराभूत झाला. आयपीएल 2023 (IPL 2023) च्या अंतिम सामन्यात उतरताच धोनीने विश्वविक्रम केला आहे. 


आयपीएलमध्ये धोनीची ऐतिहासिक कामगिरी


महेंद्र सिंह धोनीने गुजरात टायटन्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात मैदानावर प्रवेश करताच एक मोठा विक्रम रचला आहे. महेंद्र सिंह धोनी इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात 250 सामने खेळणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. धोनीनं आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाकडून 220 सामने खेळले आहेत. त्याशिवाय त्याने रायझिंग पुणे सुपर जायंट्स संघाकडून 30 सामने खेळले आहेत. 


अंतिम सामन्यात उतरताच रचला 'हा' नवा विक्रम


धोनी आयपीएलमध्ये  250 सामने खेळणारा एकमेव खेळाडू आहे. यापूर्वी कोणत्याही खेळाडूला ही कामगिरी करता आलेली नाही. धोनीनंतर रोहित शर्मा आयपीएलमध्ये सर्वाधिक खेळणारा खेळाडू आहे. रोहित शर्मा आयपीएलमध्ये 243 सामने खेळले आहेत.


आयपीएल इतिहासात सर्वाधिक सामने खेळलेले खेळाडू



  • महेंद्र सिंह धोनी : 250 सामने

  • रोहित शर्मा : 243 सामने

  • दिनेश कार्तिक : 242 सामने

  • विराट कोहली : 237 सामने

  • रवींद्र जडेजा : 225 सामने

  • शिखर धवन : 217 सामने


आयपीएलमधील धोनीची शानदार कारकीर्द 


चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीनं चमकदार विकेटकिपिंगसह उत्तम फलंदाजी केली आहे. त्याने 250 सामन्यांमध्ये 5082 धावा केल्या आहेत. यामध्ये धोनीची सर्वाधिक धावसंख्या 84 ही आहे. धोनीच्या यष्टिरक्षणातील कौशल्याला तोड नाही. धोनीनं आयपीएलच्या इतिहासात 141 झेल घेतले असून 41 स्टंपिंग केले आहे.


गुजरातचा पराभव करत चेन्नई पाचव्यांदा आयपीएल चॅम्पियन


आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने गतविजेत्या गुजरात जायंट्सचा पाच गडी राखून पराभव केला. चेन्नईनं पाचव्यांदा आयपीएल विजेतेपदावर नाव कोरलं आहे. यासोबतच चेन्नई (CSK) पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणारा मुंबई इंडियन्सनंतरचा दुसरा संघ बनला आहे. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना गुजरात संघाने 214 धावा ठोकल्या होत्या. मात्र पावसामुळे चेन्नईला विजयासाठी 15 षटकांत 171 धावांचं लक्ष्य मिळालं. चेन्नईनं शेवटच्या चेंडूवर हा सामना जिंकला. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Dhoni Retirement : धोनी निवृत्त होणार? आयपीएल जिंकल्यानंतर धोनीनं स्पष्टच सांगितलं; म्हणाला, ''चाहत्यांसाठी...''