IPL 2022: पुण्याच्या (Pune) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Maharashtra Cricket Association Stadium) सुरु असलेल्या आयपीएलच्या 46 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं सनरायजर्स हैदराबादला (Sunrisers Hyderabad Vs Chennai Super Kings) 13 धावांनी पराभूत केलं. या सामन्यात नाणेफेक जिंकून दिल्लीच्या संघानं चेन्नईला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. त्यानंतर चेन्नईच्या संघानं 20 षटकात 2 विकेट्स  गमावून 202 धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादच्या संघाला 20 षटकात 6 विकेट्स गमावून धावा 189 करता आल्या. 


सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामन्यातील दहा महत्वाचे मुद्दे-


- चेन्नईविरुद्ध नाणेफेक जिंकून हैदराबादच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.- त्यानंतर चेन्नईकडून फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉन्वेनं संघाला चांगली सुरुवात करून दिली


- या सामन्यात ऋतुराज गायकवाडनं 99 तर, डेव्हॉन कॉन्वेनं 85 धावांची महत्वाची खेळी केली.


-  चेन्नईच्या संघानं 20 षटकात 2 विकेट्स  गमावून 202 धावा केल्या.


- हैदराबादकडून टी नटराजनला दोन विकेट्स घेतल्या.


- चेन्नईनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या हैदराबाच्या संघाची सुरुवात चांगली झाली.


- पंरतु, सहाव्या षटकात मुकेश चौधरीच्या गोलंदाजीवर हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्मा माघारी परतला. त्यानंतर लगेच सातव्या षटकात राहुल त्रिपाठी शून्यावर बाद झाला.


- हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसननं संघाची एक बाजून रोखून ठेवली. परंतु, हैदराबादच्या डावातील पंधराव्या षटकात  केन विल्यमसननं त्याची विकेट्स गमावली.


- केन विल्यमसननंतर निकोलस पूरन आक्रमक फलंदाजी करत संघाला विजय मिळून देण्याचा प्रयत्न केला.परंतु, दुसऱ्या बाजूनं त्याला साथ मिळाली नाही


- प्रत्युत्तरात हैदराबादच्या संघाला 20 षटकात 6 विकेट्स गमावून धावा 189 करता आल्या. 


- चेन्नईकडून मुकेश चौधरीनं सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. 


हे देखील वाचा-