RR Vs MI, IPL 2022: मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएल 2022 चा 44 वा सामना खेळला जाणार आहे. यंदाच्या हंगामात मुंबईच्या संघानं निराशाजनक कामगिरी करून दाखवली आहे. तर, संजू सॅमसनच्या नेतृत्वात राजस्थानच्या संघानं चमकदार कामगिरी केली आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत राजस्थानचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर, यंदाच्या हंगामात एकही सामना जिंकता न आलेल्या मुंबईच्या संघ गुणतालिकेच्या तळाशी म्हणजेच दहाव्या स्थानावर आहे. 


मुंबई- राजस्थानची यंदाच्या हंगामातील कामगिरी
यंदाच्या हंगामात मुंबईच्या संघानं आठ सामने खेळले आहेत. या सर्व सामन्यात मुंबईच्या संघाला पराभव स्वीकारावा लागलाय. तर, दुसरीकडं राजस्थानच्या संघाला आठ पैकी सहा सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर, दोन सामन्यात पराभव पत्कारावा लागला आहे. 


मुंबई- राजस्थान हेड टू हेड रेकॉर्ड
आयपीएलमध्ये मुंबई आणि राजस्थान 26 वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी 13 सामन्यात मुंबईच्या संघानं विजय मिळवला आहे. तर, 12 सामन्यात राजस्थानच्या संघानं मुंबईला धुळ चाखली आहे. यंदाच्या हंगामात मुंबई आणि राजस्थानचा संघ दुसऱ्यांदा आमने सामने येणार आहेत. पहिल्या सामन्यात राजस्थानच्या संघानं बाजी मारली आहे. आजच्या सामन्यात कोणता संघ जिंकणार? हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे. 


संघ-


राजस्थानचा संभाव्य संघ-
यशस्वी जायसवाल, जोस बटलर, देवदत्त पडिकल, संजू सॅमसन (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, नाथन कुल्टर-नाईल, प्रसिद्ध कृष्णा, ट्रेन्ट बोल्ट, युजवेंद्र चहल


मुंबईचा संभाव्य संघ-
ईशान किशन, रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, अनमोलप्रीत सिंह, कायरन पोलार्ड, टिम डेव्हिड, डेनियल सॅम्स, मुर्गन अश्विन, जसप्रीत बुमराह, टाइमल मिल्स, बासिल थंपी


हे देखील वाचा-