Prasidh Krishna Vs Aaron Finch:  आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील तिसव्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders Vs Rajasthan Royals) आमने- सामने आले होते. या सामन्यात राजस्थानच्या संघानं कोलकात्याला सात धावांनी पराभूत करत आयपीएलच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. या सामन्यादरम्यान, राजस्थानचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) आणि कोलकात्याचा सलामीवीर आरोन फिंच (Aaron Finch) यांच्यात बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. 


नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या राजस्थानच्या संघानं जोस बटलरच्या झुंजार शतकाच्या जोरावर कोलकात्यासमोर 218 धावांचं लक्ष्य ठेवलं. या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकात्याचा सलामीवीर आरोन फिंचनं तुफानी फलंदाजी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. सुनील नारायण बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या कोलकात्याचा कर्णधार श्रेयस अय्यरनंही आक्रमक फलंदाजी करत संघाचा डाव सावरला. या दोघांनी 9 षटकाच्या आत कोलकात्याच्या संघाची धावसंख्या 100 वर पोहचवली. परंतु, नवव्या षटकातील पाचव्या चेंडूवर प्रसिद्ध कृष्णानं जोस बटलरच्या रुपात कोलकात्याच्या संघाला दुसरा झटका दिला. 


नेमकं काय घडलं?
आरोन फिंच बाद झाल्यानंतर आरोन फिंच पव्हेलियनकडं जात असताना प्रसिद्ध कृष्णा त्याला काही तरी म्हणाला. त्यानंतर आरोन फिंचनंही त्याला प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळत आहे. दोघांमधील बाचाबाचीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. या सामन्यात आरोन फिंचनं 28 चेंडूत 58 धावांची वादळी खेळी केली. ज्यात 9 चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे. 


राजस्थानचा सात धावांनी विजय
मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर खेळण्यात आलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं कोलकाता नाईट रायडर्सला 7 धावांनी पराभूत केलंय. या सामन्यात नाणेफेक जिंकून कोलकाताच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या राजस्थानच्या संघानं 20 षटकात 5 विकेट्स गमावून 217 धावा केल्या. प्रत्युरात कोलकात्याच्या संघ 210 धावांवर आटोपला.


हे देखील वाचा-