RCB vs GT, Inning Report :  विराट कोहलीच्या शतकी खेळीच्या बळावर आरसीबीने 197 धावांपर्यंत मजल मारली आहे. विराट कोहलीने नाबाद 101 धावांची खेळी केली. अखेरच्या साखळी सामन्यात आरसीबीला विजय अनिवार्य आहे. प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आरसीबीला आजचा सामना जिंकावाच लागणार आहे. गुजरातला विजयासाठी 198 धावांचे आव्हान आहे.


विराट कोहलीचे शतक - 


विराट कोहली याने पहिल्या चेंडूपासूनच वादळी फलंदाजी केली. विराट कोहली याने सुरुवातीला संयमी फलंदाजी करत डावाला आकार दिला. त्यानंतर आक्रमक फलंदाजी करत शतकाला गवसणी घातली. विराट कोहलीने 61 चेंडूत नाबाद 101 धावांची खेळी केली. या खेळीत विराट कोहलीने 13 चौकार आणि एक षटकार लगावला. विराट कोहलीच्या शतकी खेळीच्या बळावर आरसीबीने 197 धावांपर्यंत मजल मारली.  याने 166 च्या स्ट्राईक रेटने धावांचा पाऊस पाडला.


विराट फाफची दमदार सुरुवात 


आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील अखेरच्या साखळी सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बेंगलोरच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने दमदार सुरुवात केली. विराट कोहली आणि सलामी फलंदाज फाप डु प्लेसिस यांनी वादळी सुरुवात केली. दोघांनी 67 धावांची सलामी दिली. नूर अहमद याने फाफला बाद करत ही जोडी फोडली. फाफ डु प्लेसिस याने 19 चेंडूत 28 धावांची खेळी केली. या खेळीत फाफने 5 चौकार लगावले. फाफ बाद झाल्यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि विराट कोहली यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण ग्लेन मॅक्सवेल 11 धावांवर बाद झाला. राशिद खान याने मॅक्सवेलचा अडथळा दूर केला. मॅक्सवेल याने एक षटकार आणि एक चौकार लगावला. महिपाल लोमरोर याला आज मोठी खेळी करता आली नाही. लोमरोर फक्त एका धावेवर लोमरोरच्या गोलंदाजीवर बाद झाला. लोमरोर बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि ब्रेसवेल यांनी डाव सावरला. 


मायकल ब्रेसवेल आणि विराट कोहली यांनी आरसीबीच्या डावाला आकार दिला. चौथ्या विकेटसाठी या जोडीने 29 चेंडूत 47 धावांची भागिदारी केली. मोहम्मद शमी याने ब्रेसवेल याला बाद करत जोडी फोडली. ब्रेसवेल याने 16 चेंडूत 5 चौकाराच्या मदतीने 26 धावांची खेळी केली. ब्रेसवेल बाद झाल्यानंतर कार्तिकही लगेच तंबूत परला. कार्तिकला खातेही उघडता आले नाही. यश दयाल याने दिनेश कार्तिक याला शून्यावर बाद केले.  त्यानंतर विराट कोहली आणि अनुज रावत यांनी आरसीबीचा डाव सावरला. 


विराट -अनुजने डाव सावरला -


विराट कोहली आणि अनुज रावत पाचव्या विकेटसाठी 34 चेंडूत 64 धावांची भागिदारी केली. यामध्ये रावतने 23 धावांचे योगदान दिले. विराट कोहलीने अखेरच्या 19 चेंडूत 40 धावांची खेळी केली. विराट कोहलीने याने दमदार शतकी खेळी केली. दरम्यान, गुजरातकडून नूर अहमद याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. तर मोहम्मद शमी, यश दयाल आणि राशिद खान यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.