RCB vs GT, IPL 2023 : आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील अखेरच्या साखळी सामन्या गुजरातने नाणेफेक जिंकली. हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आरसीबीचा संघ घरच्या मैदानावर प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरेल. पावसामुळे सामना अर्धा तास उशीराने सुरुवात झालाय. पावसामुळे मैदान संथ झालेले असेल. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला अडचणी येण्याची शक्यता आहे. 


मुंबईने हैदराबादचा पराभव केल्यामुळे आरसीबीसाठी हा सामना जिंकणे अनिवार्य आहे. आजच्या सामन्यात आरसीबीचा पराभव झाल्यास मुंबईचा संघ प्लेऑफमध्ये पात्र होईल. हार्दिक पांड्याने प्लेईंग 11 मध्ये कोणताही बदल केला नाही. मागील सामन्यातील संघ कायम ठेवलाय. दुसरीकडे आरसीबीने संघात एक बदल केलाय. कर्ण शर्मा याला बाहेरचा रस्ता दाखवलाय. पाहूयात दोन्ही संघाची प्लेईंग 11


रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर : विराट कोहली, फाफ डु प्लेसिस (कर्णधार), मायकल ब्रेसवेल, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, अनुज रावत, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हर्षल पटेल, वेन पार्नेल, मोहम्मद सिराज, विजय कुमार वैशाक



गुजरात टायटन्स  : शुभमन गिल, ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (कर्णधार), दासुन शनाका, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी, यश दयाल






बंगळुरु संघासाठी प्लेऑफचं समीकरण काय?


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघासाठी प्लेऑफच्या समीकरण जाणून घ्या. सध्या 13 सामन्यांतून सात विजयांसह आरसीबी संघाकडे 14 गुण आहेत. जर आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहोचायचं असेल तर संघाला त्यांचा गुजरात विरोधातील शेवटचा साखळी सामना जिंकून 16 गुण मिळवावे लागतील. शिवाय, सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव व्हावा किंवा मुंबईला कमी फरकाने विजय मिळावा, अशी इच्छा बाळगावी लागेल. यामुळे स्थितीत आरसीबीला 16 गुण मिळतील आणि त्याचा नेट रन रेटही मुंबईपेक्षा चांगला असेल. असे झाल्यास आरसीबीला प्लेऑफचं तिकीट मिळेल. पण सध्या या सामन्यावर पावसाचं सावट आहे. मुंबईने हैदराबादवर विजय मिळवला आहे. आरसीबीला प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी विजय मिळवावा लागेल.


बंगळुरु विरुद्ध गुजरात सामना


आयपीएलच्या (IPL 2023) 16 व्या हंगामातील शेवटचा 70 वा लीग सामना आज बंगळुरु आणि गुजरात (GT vs RCB) या दोन संघात रंगणार आहे. 21 मे रोजी बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स संघ आमने-सामने येणार आहेत. गुजरात संघ आधीच प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी आरसीबी संघाला आजचा सामना जिंकणं फार गरजेचं आहे.