Matheesha Pathirana : आयपीएलच्या महत्वाच्या टप्प्यावर चेन्नई सुपर किंग्सला सर्वात मोठा धक्का बसला आहे. चेन्नईचा मॅचविनर खेळाडू बेबी मलिंगा दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर पडलाय. त्याआधीच 14 कोटींचा दीपक चाहर दुखापतीमुळे बाहेर आहे. त्यामध्ये आणखी एका खेळाडूची भर पडली आहे. चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज मथिशा पथिराना (Matheesha Pathirana) यंदाच्या हंगामात उर्वरित सामन्यातून बाहेर पडलाय. पथिराना यानं सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.
आयपीएल 2024 मध्ये चेन्नईला आतापर्यंत पाच पराभवाचा सामना करावा लागलाय. चेन्नईचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. पण प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी उर्वरित सामन्यात विजय गरजेचा आहे. मोक्याच्या वेळी पथिराना मायदेशी परतलाय. दुखापतीमुळे त्यानं माघार घेतली आहे. हॅमस्ट्रिंगमुळे पथीराना याने ब्रेक घेतला आहे. यंदाच्या हंगामात त्यानं डेथ ओव्हरमध्ये भेदक मारा केला. त्यानं प्रतिस्पर्धी फलंदाजांचं कंबरडे मोडलेय.
चेन्नईचे धन्यवाद -
मथिशा पथीराना यानं सोशल मीडियावर खास पोस्ट करत चेन्नई आणि चाहत्यांचे आभार मानले आहेत. 2024 आयपीएल चषक चेन्नई जिंकेल, आशा शुभेच्छा दिल्यानं दिल्या आहेत.
2022 पासून चेन्नईचा सदस्य -
मथिशा पथिरानानं आयपीएलमध्ये 2022 मध्ये पदार्पण केलं होतं. त्यावर्षी त्यानं केवळ दोन मॅच खेळल्या होत्या. पथिरानानं त्यावर्षी दोन मॅचमध्ये 52 धावा देत दोन विकेट मिळवल्या होत्या. आयपीएलच्या 2023 च्या पर्वात तो पर्पल कॅपच्या शर्यतीत टॉप टेन बॉलर्समध्ये होता. आयपीएलच्या 2023 च्या हंगामात त्यानं 12 मॅच खेळल्या होत्या, त्यात 371 धावा देत 19 विकेट घेतल्या होत्या. आयपीएल 2024 मध्ये पर्पल कॅपच्या शर्यतीत पथिराना सहाव्या स्थानावर आहे. त्यानं 13 विकेट घेतल्या आहेत. गेल्यावर्षी पथिराना यानं श्रीलंकेच्या संघात पदार्पण केले. त्यानं वनडेत 17 आणि टी20 मध्ये 11 विकेट घेतल्या आहेत.
धोनी वडिलांसारखा -
क्रिकेटच्या मैदानावर माझ्या वडिलांनंतर महत्त्वाची भूमिका धोनी सर बजावतात. ते माझी काळजी घेतात, सल्ले देतात. जसे वडील घरी असताना करतात तसं, असं मथिशा पथिरानानं म्हटलं. पथीरानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.