IPL 2024, MS Dhoni Rohit Sharma : शुक्रवारपासून आयपीएलच्या थराराला सुरुवात होणार आहे. पण त्याआधीच अनेक मोठ्या घटना घडल्या आहेत. आयपीएल 2024 आधी चेन्नई आणि मुंबई संघाचे कर्णधार बदलण्यात आले. आयपीएल लिलावानंतर मुंबईनं रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याकडे नेतृत्व सोपवलं. तर आज धोनीनं चेन्नईची धुरा ऋतुराज गायकवाड याच्याकडे सोपवली. त्यानंतर सोशल मीडियावर मोठी खळबळ माजली आहे. धोनींच्या निर्णायानंतर चाहत्यांमध्ये प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्मानेही एमएस धोनीसाठी खास पोस्ट टाकली आहे. रोहित शर्माच्या या पोस्टचं सर्वच स्तरावर कौतुक होताना दिसतेय.
हिटमॅन रोहित शर्मा यानं धोनीसाठी इन्स्टाग्रामवर धोनीबद्दलचा आदर व्यक्त करण्यासाठी खास पोस्ट केली आहे. रोहित शर्मानं धोनी आणि त्याचा फोटो पोस्ट केलाय. धोनीप्रमाणेच रोहित शर्मानेही पाच आयपीएल चषक जिंकण्याचा पराक्रम केला आहे. आता 17 व्या हंगाात रोहित शर्मा आणि धोनी फक्त खेळाडू म्हणून खेळणार आहेत.
आयपीएलच्या 17व्या हंगामात रोहित शर्मा आणि एमएस धोनी कर्णधार नसून ते फक्त एक खेळाडू म्हणून खेळताना दिसणार आहेत. यामुळे एकंदरीत काहीही असलं तर दोघांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. धोनीच्या निर्णायाचं अनेकांनी स्वागत केलेय. तर रोहित शर्मानं त्याच्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी पोस्ट केला आहे. धोनी आणि रोहित शर्मा यांनी आपापल्या संघाला प्रत्येकी पाच पाच वेळा चषक जिंकून दिलाय. आयपीएल 2024 आधीच दोन्ही संघाचे कर्णधार बदलण्यात आले आहेत.
सीएसकेची धुरा ऋतुराजच्या खांद्यावर -
आयपीएल 2024 ला सुरुवात होण्यासाठी 24 तास शिल्लक असतानाच चेन्नईनं मोठा निर्णय घेतला. चेन्नईनं पुणेकर ऋतुराज गायकवाड याच्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं. धोनीनं आज ऋतुराजकडे नेतृत्व सोपवलं. ऋतुराज गायकवाड यानं आयपीएलमध्ये आतापर्यंत 52 सामने खेळले आहेत. त्याआधी त्यानं देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्र संघाची धुरा संभाळली आहे.
मुंबईची धुरा हार्दिक पांड्याकडे -
आयपीएल लिलावाआधी मुंबई इंडियन्सनं हार्दिक पांड्याला ट्रेड करत ताफ्यात घेतलं. त्यानंतर रोहित शर्माची कर्णधारपदावरुन हाकालपट्टी करत हार्दिक पांड्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवली. रोहित शर्माकडून कर्णधारपद काढल्यानंतर चाहत्यांमध्ये संताप होता. सोशल मीडियावर जाहीर नाराजी व्यक्त करण्यात आली. हार्दिक पांड्या यंदाच्या हंगामात मुंबईची धुरा संभाळणार आहे.