IPL 2024 CSK vs RCB LIVE Streaming : अखेर तो क्षण आलाच, शुक्रवारपासून आयपीएलच्या 17 व्या हंगामाला दिमाखात सुरुवात होणार आहे. चेन्नई आणि आरसीबी यांच्यातील सामन्यानं आयपीएलचा शुभारंभ होणार आहे. गतवेळचा विजेता चेन्नई आणि आरसीबी यांच्यामध्ये थरार पाहायला मिळणार आहे. चेन्नई आणि आरसीबी यांच्यामध्ये एकापेक्षा एक धुरंधर खेळाडू आहेत. दोन्ही संघातील स्टार खेळाडू कोणत्याही क्षणी सामना फिरवू शकतात. सीएसके आणि आरसीबी यांच्यातील टक्कर पाहण्यासाठी मैदानात झुंबड उडेल. त्याशिवाय घरातूनही सामना पाहता येणार आहे. या सामन्यासंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात...


IPL 2024 मध्ये चेन्नई आणि बंगळुरु यांच्यातील पहिला सामना कधी होणार ? 


चेन्नई आणि बंगळुरु यांच्यामध्ये आयपीएल 2024 चा सलामीचा सामना होणार आहे. 22 मार्च, शुक्रवारी हा सामना होईल.


चेन्नई आणि बंगळुरु यांच्यातील सामना कुठे खेळवला जाणार?


चेन्नई सुपर किंग्स आणि  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सलामीचा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. 


चेन्नई आणि बंगळुरु यांच्यातील सामना किती वाजता सुरु होणार ? 


चेन्नई सुपर किंग्स आणि  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील आयपीएल 2024 मधील सलामीचा सामना रात्री आठ वाजता सुरु होणार आहे.


चेन्नई आणि बंगळुरु यांच्यातील सामना टिव्हीवर कुठे पाहाल ?
 
सीएसके आणि आरसीबी यांच्यातील सलामीचा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल. 


आयपीएलचे सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईलवर कुठे पाहता येतील ? 


चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यामधील थरार आणि आयपीएलमधील प्रत्येक सामन्याचा थरार जिओ सिनेमा अॅपवर पाहता येईल. जिओ सिनेमा अॅपवर मोफत सामने पाहता येणार आहे.


चेन्नई सुपर किंग्समध्ये कोण कोणते धुरंधर - 


एमएस धोनी (कर्णधार), मोइन अली, दीपक चाहर, तुषार देशपांडे, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मिशेल सँटनर, सिमरजीत सिंह, निशांत सिंधु, प्रशांत सोलंकी, महेश तिक्ष्णा, रचिन रवींद्र, शार्दुल ठाकुर, डेरिल मिशेल, समीर रिजवी, मुस्तफिजुर रहमान, अवनीश राव अरावली 


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा ताफ्यात कोण कोण ?


फाफ डु प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक्स, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, मयंक डागर, विजयकुमार वैश्यक, आकाश दीप, मोहम्मद सिराज, रीस टॉपले, हिमांशु शर्मा, राजन कुमार, कॅमरून ग्रीन, अल्ज़ारी जोसेफ, यश दयाल, टॉम करन, लॉकी फर्ग्यूसन, स्वप्निल सिंह, सौरव चौहान