Virender Sehwag On Mumbai Indians : आयपीएलचा 15 वा हंगाम रोमांचक स्थितीत पोहचला आहे. आतापर्यंत झालेल्या 50 सामन्यानंतरही प्लेऑफमध्ये एकही संघ पोहचला नाही. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात संघाने प्लेऑफमधील जागा जवळपास निश्चित केली आहे. एका विजयानंतर गुजरातचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरणार आहे. त्याशिवाय लखनौ, राजस्थान, आरसीबी, दिल्ली, पंजाब आणि हैदराबाद आणि कोलकाता या संघामध्ये उर्वरित स्थानासाठी लढत असणार आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई इतर संघाचे प्लेऑफचे स्थान धोक्यात आणू शकतात. या संघाचे प्लेऑफमधील आव्हान जवळपास संपुष्टात आलेय. आज मुंबईचा सामना गुजरातविरोधात होणार आहे. या सामन्यापूर्वी भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याने मोठं वक्तव्य केलेय.
मुंबई आणि गुजरात यांच्यातील सामन्याबाबत बोलताना सेहवागने मोठं वक्तव्य केले आहे. या सामन्यात सर्व दिग्गज खेळाडूंना आराम मिळायला हवा, असं मत वीरेंद्र सेहवाग याने व्यक्त केलेय. रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि कायरन पोलार्ड यांना आराम द्यावा, असा सल्ला वीरेंद्र सेहवागने मुंबईला दिलाय. एका क्रिकेट वेबसाईटशी बोलताना सेहवाग म्हणाला की, "मुंबईने सर्व सिनिअर खेळाडूंना आराम देण्याची वेळ आली आहे. त्यांच्याकडे आता गमावण्यासाठी काहीच नाही. मुंबईने पुढील हंगामासाठी तयारी सुरु करायला हवी. बेंच स्ट्रेंथ तपासण्यासाठी रोहित शर्मा, पोलार्ड आणि बुमराह यासारख्या खेळाडूंना आराम देण्याची गरज आहे."
पाच वेळा आयपीएल चषकावर नाव कोरणाऱ्या मुंबई इंडियन्सची यंदाच्या हंगामात खराब कामगिरी झाली आहे. मुंबईला सलग आठ पराभवाचा सामना करावा लगाला. नऊ सामन्यात मुंबईला फक्त एकच विजय मिळवता आलाय. रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबईचा संघ गुणतालिकेत तळाशी आहे. मुंबईचा नेटरनरेटही -0.836 इतका आहे.
हे देखील वाचा-