GT Vs MI: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 51 व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स (Gujarat Titans Vs Mumbai Indians) यांच्यात जोरदार टक्कर पाहायला मिळणार आहे. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत गुजरातचा संघ 16 गुणांसह अव्वल स्थानी आहे. तर, यंदाच्या हंगामात निराशाजनक कामगिरी करणारा मुंबईचा संघ गुणतालिकेत तळाशी म्हणजेच दहाव्या क्रमांकावर आहे. आजच्या सामन्यात कोलकात्याचा सलामीवीर शुभमन गिलकडून चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा केली जात आहे. मागील पाच सामन्यांपैकी तीन सामन्यात त्यानं दहाचाही आकडा ओलांडला नाही.दरम्यान, गिलच्या मुंबईविरुद्धच्या कामगिरीवर एक नजर टाकूया.


मुंबईविरुद्ध शुभमन गिलची कामगिरी
शुभमन गिलनं मुंबईविरुद्ध आतापर्यंत सात सामने खेळले आहेत. ज्यात 23.71 सरासरीनं आणि 124.81 स्ट्राईक रेटनं 166 धावा केल्या आहेत. ज्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. गिलनं त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 68 सामन्यात 125.15 च्या सरासरीनं 1 हजार 686 धावा केल्या आहेत. ज्यात 12 अर्धशतक आहेत. त्याची आयपीएलमधील 96 सर्वोत्तम धावसंख्या आहे.


मुंबईच्या गोलंदाजाविरुद्ध गिलचं प्रदर्शन
मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह शुभमन गिलसाठी मोठ डोकेदुखी ठरू शकतो. गिलनं बुमराहविरुद्ध 20 चेंडूत 24 धावा केल्या आहेत. बुमराहनं त्याला एक वेळा बादही केलं आहे. गिलनं जयदेव उनाडकटविरुद्ध संथ फलंदाजी केली आहे. उनादकटच्या 18 चेंडूत गिलनं 17 धावा केल्या आहेत.


फिरकी गोलंदाजांविरुद्ध गिलची चमकदार कामगिरी
वेगवान गोलंदाजीविरुद्ध गिलची फलंदाजीची सरासरी 30 च्या खाली आहे. पण फिरकी गोलंदाजांविरुद्ध त्याची सरासरी 45 च्या वर जाते. गिलनं वेगवान गोलंदाजांविरुद्ध 64 डावांमध्ये 1,099 धावा केल्या आहेत आणि 40 वेळा तो बाद झाला आहे.दुसरीकडे, फिरकी गोलंदाजीविरुद्ध त्यानं 132.80 च्या स्ट्राइक रेटनं 587 धावा केल्या आहेत आणि यादरम्यान केवळ 13 वेळा तो बाद झाला आहे.


हे देखील वाचा-