Rohit Sharma As Mumbai Indians Captain : 2008 मध्ये आयपीएलची धमाकेदार सुरुवात झाली, पण पाच हंगामानंतरही मुंबईला जेतेपद पटकावता आले नाही. सचिन, पाँटिंग, जयसूर्या, भज्जी यासारख्या दिग्गजांचा भरणा असणाऱ्या मुंबईला जेतेपद पटकावता आले नाही. सचिन तेंडुलकर पासून हरभजन सिंह यांच्याकडे नेतृत्व सोपवूनही मुंबईला विजय मिळवता आला नाही. 2023 मध्ये मुंबईने रिकी पाँटिंगच्या खांद्यावर जबाबदारी दिली. पण तरीही पाँटिंगच्या नेतृत्वात मुंबईला शानदार कामगिरी करता आली नाही. मुंबईच्या मॅनेजमेंटने स्पर्धेच्या मध्येच मोठा निर्णय घेतला. युवा रोहित शर्माच्या खांद्यावर जबाबदारी सोपवली. मुंबईचा हा डाव एकदम बरोबर बसला. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने थेट चषकावरच नाव कोरले. सलग पाच वर्ष चषकापासून वचिंत असणाऱ्या मुंबईसाठी रोहित कमाल केली. संघाला पहिले जेतेपद मिळवून दिले. तरीही आज रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेण्यात आलेय, याबाबत चर्चा सुरु आहेत. 


रोहित शर्माने मुंबई इंडियन्सचं चित्र बदलले...


2013 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने पहिले आयपीएल जेतेपद पटकावले. मुंबईसाठी रोहित शर्मा हिरो ठरला. जे काम सचिन, भज्जी अन् पाँटिंगला करता आले नाही, ते युवा रोहित शर्माने करुन दाखवलं. त्याचवर्षी मुंबईने चॅम्पियन्स लीग स्पर्धाही जिंकली. रोहित शर्माने 2013 पासून मागे वळून पाहिले नाही. रोहित शर्माने पाच वेळा मुंबईला चषक जिंकून दिला. 2014 मध्ये मुंबईला जेतेपद राखता आले नाही. लागपाठ पाच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला, पण रोहितने हार मानली नाही. पहिल्या पाच सामन्यात पराभव झाल्यानंतरही मुंबईने प्लेऑफमध्ये जागा मिळवली होती. मुंबईला जेतेपद राखता आले नाही. पण रोहितच्या नेतृत्वाने सर्वांनाच भूरळ पाडली.  


रोहित पर्वाला सुरुवात अन् शेवट - 


2013 मध्ये जेतेपद मिळणारा मुंबई इंडियन्स संघाने आयपीएलच्या मैदानात शानदार कामगिरी सुरुच ठेवली. 2014 चं जेतेपद राखता आले नाही. पण 2015 मध्ये मुंबईने पुन्हा एकदा जेतेपद पटकावले. 2016 सरासरी राहिलं. पण 2017 मध्ये पुन्हा एकदा रोहितच्या नेतृत्वात मुंबईने चषकावर नाव कोरले. त्यानंतर 2018 मध्येही मुंबईने चषक उंचावला.  पण 2018 मध्ये मुंबईला प्लेऑफमध्येही स्थान पटकावता आले नाही. पण त्यानंतर 2019 आणि 2020 मध्ये मुंबई इंडियन्सने चषकावर नाव कोरले. मुंबईने आयपीएलच्या इतिहासात पाच वेळा चषकावर नाव कोरले. आयपीएलच्या इतिहासातील मुंबई हा सर्वात यशस्वी संघ मानला जातो.  2020 नंतर मुंबईला लागोपाठ तीन हंगामात लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळेच यंदा हार्दिक पांड्याकडे नेतृत्व सोपवण्यात आले. पण सचिन, पाँटिंग अन् भज्जीला जमलं नाही ते रोहितनं करुन दाखवलं. त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेतल्यामुळे चाहत्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. सोशल मीडियावर रोष व्यक्त केला जातोय. चेन्नईचं कर्णधारपद धोनी 40 वर्षानंतरही करत असेल तर रोहितला कायम का ठेवलं नाही? असा सवाल विचारण्यात येतोय.