IPL 2022,  RCB vs RR : आयपीएलच्या 15 व्या हंगामात आज  राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) यांच्यामध्ये सामना सुरु आहे. आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत राजस्थानच्या फंलदाजांना लगाम घातला. राजस्थानच्या रियान पराग याने यावेळी विस्फोटक फलंदाजी करत संघाचा धावसंख्या सन्माजनक केली. सामन्याच्या अखेरच्या षटकादरम्यान हर्षल पटेल आणि रियान पराग यांच्या राडा झाला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  


अखेरच्या षटकात झाला राडा -
राजस्थान रॉयल्सच्या अखेरच्या षटकार हर्षल पटेल आणि रियान पराग यांच्यामध्ये तू तू मैं मैं झालं. अखेरचं षटक आरसीबीकडून हर्षल पटेल याने फेकले. तर समोर रियान पराग होता. रियान परागने हर्षल पटेलच्या षटकात हल्लाबोल केला. षटकार मारत अर्धशतक पूर्ण केले.  रियान परागने हर्षलच्या या षटकात 18 धावा चोपल्या. अखेरच्या चेंडूवरही षटकार लगावला. त्यानंतर हर्षल पटेलचा पारा चढला. तंबूत परतणाऱ्या रियानला हर्षल पटेलने डिवचले. दोघांमध्ये थोडी शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर दोन्ही संघाच्या खेळाडूंनी त्यांना थांबवले.  














रियानचं नाबाद अर्धशतक - 
संजू बाद झाल्यानंतर मात्र संघाच्या सर्व आशा युवा खेळाडू रियान परागच्या खांद्यावर आल्या. त्यानेही जबाबदारी चोखरित्या पार पाडत एक दमदार आणि संयमी अर्धशतक झळकावलं. त्याने 31 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकार ठोकत नाबाद 56 धावा झळकावल्या. ज्यामुळे संघाची धावसंख्या 140 च्या पुढे गेली. ज्यामुळे आता आरसीबीला विजयासाठी 145 धावा करायच्या आहेत.


आरसीबीची चोख गोलंदाजी - 
आरसीबी संघाने सुरुवातीपासून दमदार गोलंदाजी केली. यावेळी मोहम्मद सिराजने अतिशय महत्त्वाचे विकेट्स घेत क्षेत्ररक्षणही चांगलं केलं. आरसीबीकडून सिराज, हेझलवुड आणि हसरंगा यांनी प्रत्येकी दोन तर हर्षल पटेलने एक विकेट घेतली. 


हे देखील वाचा-