IPL 2022 Playoffs : आयपीएलच्या 15 व्या हंगामाला सुरुवात होऊन महिना उलटला आहे. जवळपास अर्धे आयपीएल संपले आहेत. तरीही प्लेऑफमध्ये पोहचणाऱ्या संघाची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. कोणते चार संघ प्लेऑफमध्ये पोहचणार हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल. पण प्लेऑफमध्ये पोहचणाऱ्या संघाचा अंदाज आतापासूनच बांधला जात आहे. क्रिकेट चाहते, तज्ज्ञ आपापली मते नोंदवत आहेत. न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू आणि आरसीबीचा माजी कर्णधार डॅनिअल विटोरी याने यंदा प्लेऑफमध्ये पोहचणारे चार संघ कोणते असतील, त्याचा अंदाज वर्तवला आहे. 


26 मार्च रोजी आयपीएलच्या 15 व्या हंगामाची दणक्यात सुरुवात झाली आहे. 29 मे रोजी आयपीएलचा अंतिम सामना होणार आहे.  कोलकाता आणि अहमदाबाद येथे प्लेऑफ आणि अंतिम सामने खेळवले जाणार आहेत. त्याआधी डॅनिअल विटोरीने प्लेऑफमध्ये पोहचणाऱ्या चार संघाबाबत भविष्यवाणी केली आहे. ईएसपीएनक्रिक इन्फोला दिलेल्या मुलाखतीत डॅनियल विटोरीने राजस्थान रॉयल्स, गुजरात टाइटन्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि आरसीबी यंदा प्लेऑफमध्ये पोहचतील असा अंदाज वर्तवला आहे. 


विटोरीने वर्तवलेल्या अंदाजानुसार,  राजस्थान आणि आरसीबीवगळता लखनौ आणि गुजरात दोन्ही संघ नवीन आहेत. विटोरी म्हणाला की, या संघांनी आतापर्यंत चांगले प्रदर्शन केले आहे. संघाचं संतुलनही चांगले आहे, त्यामुळे हे संघ प्लेऑफमध्ये पात्र ठरतील. हार्दिक पांडयाच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स आणि संजूच्या नेतृत्वातील राजस्थान संघाने यंदा दमदार कामगिरी केली आहे. दोन्ही संघ प्लेऑफमध्ये पोहचतील असा अंदात आहे.  


विल्यमसनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या हैदराबादने लागोपाठ पाच सामने जिंकले आहेत. दहा गुणांसह हा संघ गुणतालिकेत दुसर्या क्रमांकावर आहे. अशात हा संघ प्लेऑफच्या स्पर्धेत आघाडीवर आहे.  राजस्थान रॉयल्सने सात सामन्यात विजय मिळवले आहे. आतापर्यंत फक्त दोन सामने गमावले आहेत. त्यामुळे हा संघही प्लेऑफच्या स्पर्धेत आघाडीवर आहे.  


हे देखील वाचा-