RCB vs PBKS IPL 2024: आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यात सामना रंगणार आहे. सायंकाळी 7.30 वाजता बंगळुरुमधील चिन्नास्वामीच्या मैदानात हा सामना रंगणार आहे. 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (RCB) यंदाच्या हंगामातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध खेळला. या सामन्यात चेन्नईने बंगळुरुचा पराभव केला. तर पंजाब किंग्सने पहिला सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळला. या सामन्यात पंजबाने दिल्लीला पराभूत केले. आज दोघांमध्ये सामना रंगणार असल्याने यामध्ये कोण बाजी मारणार हे महत्वाचं ठरणार आहे. 

यंदाच्या हंगामात आरसीबीचा संघ पहिला विजय मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे. तर पंजाब विजयाची मालिका सुरु ठेवण्यासाठी प्रयत्न करेल. आरसीबीच्या वेगवान गोलंदाजांनाही पंजाब किंग्जविरुद्ध जबाबदारीने खेळावे लागणार आहे. मोहम्मद सिराज, अल्झारी जोसेफ आणि यश दयाल यांनी चेन्नईविरुद्ध एका षटकांत दोन बाऊन्सर टाकण्याच्या त्यांच्या कोट्याचा पुरेपूर वापर केला, परंतु या दरम्यान त्यांनी त्यांचे लाइन आणि लेन्थवरील नियंत्रण गमावल्याचे पाहायला मिळाले. आजच्या सामन्यासाठी आरसीबी आणि पंजाबची संभाव्य प्लेइंग XI काय असेल जाणून घ्या...

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: विराट कोहली, फाफ डुप्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, अनुज रावत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, रीस टोपली/अल्झारी जोसेफ, कर्ण शर्मा, मयंक डागर, मोहम्मद सिराज. इम्पॅक्ट प्लेयर: यश दयाल.

पंजाब किंग्स : शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, सॅम कुरन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग. इम्पॅक्ट प्लेयर: प्रभसिमरन सिंग.

बंगळुरूची खेळपट्टी कशी असेल?

आरसीबीच्या फिरकीपटूंना वेगवान आउटफिल्डवर कठीण परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार राहावे लागेल. या मैदानावर बहुतेक प्रसंगी संघाने एका डावात 200 हून अधिक धावा केल्या आहेत आणि हे 27 वेळा घडले आहे. या खेळपट्टीवर आयपीएलमधील पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या 172 आहे. यामुळे आरसीबीच्या वेगवान गोलंदाजांनाही पंजाब किंग्सविरुद्ध जबाबदारीने खेळावे लागणार आहे. 

संबंधित बातम्या:

आशिष नेहराचा ते शब्द अन् 19 व्या षटकांत 2 विकेट्स; 10 कोटीत विकत घेतलेला स्पेन्सर जॉन्सन कोण?

IPL 2024 Latest Points Table: चेन्नई सुपर किंग्सला मागे टाकत राजस्थान रॉयल्स नंबर 1 वर; पाहा आयपीएलचे Latest Points Table