MI, RCB, IPL 2023 : अखेरच्या दोन सामन्यात तीन संघाचे भवितव्य ठरणार आहे. चौथ्या क्रमांकासाठी तीन संघ शर्यतीत आहेत. रविवारी दुपारी मुंबई आणि हैदराबाद यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. तर आरसीबी आणि गुजरात यांच्यात दुसरा सामना रंगणार आहे. या दोन सामन्यानंतर प्लेऑफचा चौथा संघ कोणता हे निश्चित होणार आहे. मुंबईसाठी जमेची बाजू म्हणजे...  बेंगलोरमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. आज दिवसभरात आरसीबी आणि गुजरातच्या संघाला सराव करता आला नाही. रविवारीही बंगोलरमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


मुंबई की आरसीबी, कोण मारणार बाजी ? - 


प्लेऑफचे तीन संघ मिळाले आहेत. चौथ्या संघासाठी रविवारची वाट पाहावी लागणार आहे. मुंबई अथवा आरसीबी यांच्यातील एक संघ प्लेऑफमध्ये पोहचण्याची संधी जास्त आहे. मुंबईला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. मुंबईचा रनरटे मायनसमध्ये आहे. आरसीबीचा रनरेट मुंबईच्या तुलनेत चांगलाय. आरसीबीसमोर गुजरातचे आव्हान आहे. तर मुंबईसमोर हैदराबादचे नवाब असतील. 


राजस्थानलाही संधी - 


आरसीबी आणि मुंबईचा पराभव झाल्यास राजस्थानचा संघालाही प्लेऑफमध्ये प्रवेश मिळू शकतो. आरसीबीचा मोठ्या फरकाने पराभव व्हायला लागेल. आरसीबीचा रनरेट चांगलाय. प्लेऑफचा तिसरा संघ कोणता? याकडे लक्ष लागलेय. 


लखनौ तिसऱ्या क्रमांकावर - 


आजच्या पहिल्या सामन्यात दिल्लीचा पराभव करत चेन्नईने प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला होता. गुजरात आणि चेन्नई यांच्यामध्ये क्वालिफायर 1 चा सामना होणार आहे. आज दुसऱ्या सामन्यात लखनौने कोलकात्याचा पराभव करत प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे. चेन्नई आणि लखनौ यांचे समान 17 गुण आहेत.. पण चेन्नईचा नेट रटनेर चांगला असल्यामुळे दुसऱ्या क्रमांकावर पोहचलेत. लखनौ संघ तिसऱ्या क्रमांकावर असून एलिमिनेटर सामना खेळेल.. रविवारी दोन सामने होणार आहेत.... आरसीबी आणि मुंबई यांच्यातील एक संघ प्लेऑफसाठी पात्र होईल.. मुंबई आणि हैदराबाद यांच्यात वानखेडे स्टेडिअमवर सामना होणार आहे. तर आरसीबी आणि गुजरात यांच्यात बेंगलोरमध्ये लढत होणार आहे. मुंबईला प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी हैदराबादला मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल.. तर दुसरीकडे आरसीबीला गुजरातचा पराभव करावा लागेल. 


गुजरात आणि चेन्नई यांच्यात क्वालिफायर एक सामना - 


IPL 2023, Qualifier 1 - CSK Vs GT : धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई आणि हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात यांच्यामध्ये क्वालिफायर 1 चा सामना होणार आहे.  23 मे 2023 रोजी चेपॉक स्टेडिअमवर गुजरात आणि चेन्नई यांच्यामध्ये क्वालियाफाय 1 सामना होणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता सामना रंगणार आहे. चेन्नई घरच्या मैदानावर हार्दिक पांड्यासोबत दोन हात करणार आहे. यामधील विजेता संघ फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. तर पराभूत संघाला आणखी एक संधी मिळणार आहे.  क्वालिफायर 1 मध्ये पराभूत झालेला संघ ELIMINATOR मधील विजेत्या संघासोबत दोन हात करेल.