RCB vs CSK IPL 2023 1st Innings Highlight : आयपीएलच्या 24 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) यांच्यात लढत पाहायला मिळत आहे. आरसीबीने नाणेफाक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईच्या फलंदाजांनी बंगळुरुच्या फलंदाजांना चांगलंच धुतलं. चेन्नई संघाने सहा गडी बाद 226 धावांची खेळी केली. चेन्नई संघाने बंगळुरु संघाला 227 धावांचं लक्ष्य दिलं आहे. 


पहिल्यांदा फलंदाजी करताना चेन्नईची संथ सुरुवात झाली. पहिल्या षटकात चेन्नईला फक्त तीनच धावा करता आल्या. त्यानंतर तिसऱ्या षटकात चेन्नईला पहिला धक्का बसला. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात ऋतुराज गायकवाड झेलबाद झाला. त्यानंतर रहाणे मैदानात आला. रहाणे मैदानात आल्यावर मैदानात धावांचा पाऊस पाडला. पॉवर प्लेमध्ये चेन्नई सुपर किंग्सने 1 गडी गमावून 53 धावा केल्या. यादरम्यान अजिंक्य रहाणेने स्फोटक फलंदाजी केली.


रहाणेने 14 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 28 धावा केल्या. त्याचवेळी कॉनवेही चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळाला. चेन्नईने दहाव्या षटकात 90 धावांवर दुसरी विकेट गमावली. अजिंक्य रहाणे 20 चेंडूत 37 धावा करून बाद झाला. त्याने 3 चौकार आणि 2 षटकार मारले. रहाणेला हसरंगाने बोल्ड केलं. त्यानंतर डेवॉन कॉनवे आणि शिवम दुबे यांनी दमदार अर्धशतकी खेळी केली. तिसऱ्या विकेटसाठी कॉनवे आणि शिवमने चांगली भागीदारी केली.


चेन्नईने 20 षटकात 6 गडी गमावून 226 धावा केल्या. यामध्ये सलामीवीर डेवॉन कॉनवेने 83 धावा केल्या तर मधल्या फळीत फलंदाजीला आलेल्या शिवम दुबेने 52 धावांची जलद खेळी केली. डेवॉन कॉनवे आणि शिवम दुबे यांच्या शानदार फलंदाजीसमोर आरसीबी संघाच्या गोलंदाजांची रणनीती पूर्णपणे अपयशी ठरल्याचं चित्र होतं. दोन्ही खेळाडूंनी तिसऱ्या विकेटसाठी 37 चेंडूत 80 धावांची भागीदारी केली. या सामन्यात कॉनवे 45 चेंडूत 83 धावांची उत्कृष्ट खेळी करून तंबूत परतला. (RCB vs CSK IPL 2023 1st Innings Highlight )


शिवम दुबेने 27 चेंडूत 2 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 52 धावांची चमकदार खेळी केली. त्यानंतर शिवम दुबे बाद झाल्यावर मोईन अली आणि रवींद्र जडेजा यांनी अखेरच्या षटकांमध्ये जलद धावा करण्याचा प्रयत्न केला. रवींद्र जडेजाने 8 चेंडूत 10 धावा केल्या तर मोईन अलीने 9 चेंडूत 19 धावा केल्या. आरसीबीसाठी मोहम्मद सिराज, वेन पारनेल, ग्लेन मॅक्सवेल, विजयकुमार वैशाक, वानिंदू हसरंगा आणि हर्षल पटेल यांनी या सामन्यात 1-1 बळी घेतला. चेन्नई संघाने 20 षटकांत 226 धावा केल्या. (RCB vs CSK IPL 2023 1st Innings Highlight )