चेन्नई : आयपीएलच्या (IPL 2024) 17 व्या हंगामातील पहिल्या लढतीत आरसीबीनं (Royal Challengers Bengaluru) टॉस जिंकत प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला होता. फाफ डु प्लेसिसनं आक्रमक बॅटिंग करत 35 धावा केल्या होत्या. मुस्तफिजूर रहमान यानं आरसीबीच्या चार विकेट घेत बॅकफूटवर ढकललं होतं. मात्र, आरसीबीचा अनुभवी फलंदाज दिनेश कार्तिक (Dinesh Kartik) याच्या साधीनं उत्तराखंडच्या अनुज रावतनं (Anuj Rawat) डाव सावरला. आरसीबीनं अनुज रावतला 2023 च्या लिलावात 3.4 कोटी रुपयांची बोली लावत संघात घेतलं होतं. यापूर्वीच्या हंगामात संधी मिळूनही चांगली कामगिरी न केल्यानं अनुज रावत बाबत उलट सुलट चर्चा सुरु होत्या. मात्र, अनुज रावतनं आजच्या कामगिरीतून टीकाकारांना उत्तर तर दिलंच मात्र आरसीबीचा डाव देखील सावरला. 


दिनेश कार्तिकच्या साथीनं डाव सावरला


अनुज रावत आणि दिनेश कार्तिक मैदानात आले तेव्हा आरसीबीच्या 5 विकेट गेलेल्या. 78 धावांवर 5 विकेटपासून अनुज रावत आणि दिनेश कार्तिकनं आरसीबीला 173 धावांपर्यंत पोहोचवलं. अनुज रावतनं 25 बॉलमध्ये 3 षटकार आणि 4 चौकारांसह 48 धावा केल्या. अनुज आणि दिनेश कार्तिक यांनी केलेल्या खेळीमुळं आरसीबीनं मॅचमध्ये कमबॅक केलं. 


कोण आहे अनुज रावत?


आयपीएलमध्ये भारतातील अनेक युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. भारतातील युवा क्रिकेटपटूंना विदेशातील नामांकित खेळाडूंसोबत क्रिकेट खेळण्याची संधी मिळते. अनुज रावत हा मूळचा उत्तराखंडचा खेळाडू असून त्यानं दिल्लीच्या टीममधून रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. अनुज रावत 2021 पासून आयपीएल खेळतोय. 


अनुज रावतनं 2022 च्या आयपीएलमध्ये 8 मॅचमध्ये 129 धावा केल्या होत्या. तर 66 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.  


आरसीबीनं 3.4 कोटी रुपयांमध्ये संघात घेतलं?


टीम इंडियाचा विकेट कीपर रिषभ पंतप्रमाणं अनुज रावत देखील उत्तराखंडचा आहे. अनुज रावतवर 2023 च्या आयपीएलपूर्वीच्या लिलावात अनेक संघांनी बोली लावली होती.  अनुज रावतला संघात घेण्यासाठी स्पर्धा लागली होती. मात्र, अखेर आरसीबीनं 3 कोटी 40 लाखांमध्ये संघात संधी दिली होती.  


अनुज रावत उत्तराखंडच्या नैनितालचा रहिवासी आहे. रिषभ पंतप्रमाणं दिल्लीत येऊन त्यानं क्रिकेट करिअरमध्ये पुढील वाटचाल केली. दिल्लीच्या टीमधून त्यानं रणजीमध्ये पदार्पण केलं. अनुज रावत आक्रमक बॅटिंगसाठी ओळखला जातो. 


दरम्यान, आतापर्यंतच्या आयपीएलच्या 16 मॅचेसमध्ये अनुज रावतच्या नावावर केवळ एक अर्धशतक आहे. मात्र, आज टीमच्या कॅप्टननं दाखवलेला विश्वास अनुज रावतनं सार्थ ठरवला आहे. अनुजनं अनुभवी दिनेश कार्तिकसोबत 95 धावांची भागिदारी करुन संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली. आरसीबीनं चेन्नईला 174 धावांचं आव्हान दिलं.  


संबंधित बातम्या : 


CSK vs RCB Score Live IPL 2024: 'माही' मैदानाबाहेर चेंडू टोलावणार, किंग कोहली सलामीला येणार; CSK-RCB आज भिडणार


Virat Kohli : विराट कोहलीच्या नावावर चेन्नई विरुद्धच्या मॅचमध्ये तीन विक्रम, सहा धावा करताच...