IPL 2024, CSK vs RCB : आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फिरकीला मदत करणाऱ्या खेळपट्टीवर धावा काढून तगड्या चेन्नईला रोखण्यासाठी आरसीबीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आरसीबीकडून अल्जारी जोसेफ याला संधी देण्यात आला आहे. चेन्नईकडून समीर रिझवी याचं पदार्पण झालेय. त्याशिवाय रचिन रवींद्र याचेही आयपीएलमध्ये पदार्पण झालेय. 


रंगारंग कार्यक्रम - 


आयपीएलच्या 17 व्या हंगामाची दिमाखात सुरुवात झाली. आरसीबी आणि चेन्नई यांच्यातील सामन्याआधी चेपॉकवर रंगारंग कार्यक्रम पार पडला. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांनी चाहत्यांचं मनोरंजन केले. सोनू निगम यानं आपल्या गाण्यानं सर्वांचीच मनं जिंकली. चाहत्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. विराट विराट.... आणि धोनी धोनीच्या घोषणांनी स्टेडियम दणाणले होते.


आरसीबीची प्लेईंग 11 - 


फाफ डु प्लेसिस, विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमरुन ग्रीन, दिनेश कार्तिक, अनुज रावत, कर्ण शर्मा, मयांक डांगर, मोहम्मद सिराज, अल्जारी जोसेफ


चेन्नईची प्लेईंग 11 - 


रचीन रवींद्र, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, समीर रिझवी, डॅरेल मिचेल, महिश तिक्ष्णा, रवींद्र जाडेजा, एमएस धोनी, मुस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे, दीपक चाहर






चेपॉकमध्ये आरसीबीचे आकडे खराब


आयपीएल 2008 च्या हंगामात, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध केवळ 126 धावा केल्या होत्या, परंतु तरीही ते बचाव करण्यात यशस्वी ठरले. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर 14 धावांनी विजयी झाला होता. मात्र त्यानंतर चेपॉक स्टेडियममध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला यश मिळालेले नाही. चेपॉकमध्ये दोन्ही संघ 7 वेळा आमनेसामने आले, परंतु प्रत्येक वेळी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा पराभव झाला. 


चेन्नईचं आरसीबीवर वर्चस्व-


आयपीएलच्या इतिहासात दोघांमध्ये 31 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये सीएसकेने 20 जिंकले आहेत. तर, आरसीबीने केवळ 10 सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला. चेपॉकमध्ये दोन्ही संघांनी 8 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये चेन्नईने 7 जिंकले आहेत, तर बेंगळुरूने फक्त 1 सामना जिंकला आहे.