CSK vs SRH, Pitch Report : आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये आज चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (CSK vs SRH) या दोघांमध्ये सामना रंगणार आहे. स्पर्धेतील आजचा हा सामना नवी मुंबईतील डी. वाय. पाटील मैदानात खेळवला जाणार असून दुपारच्या वेळेत होणार असल्याने संघाची रणनीती काहीशी वेगळी असेल. आयपीएलचे बहुतांश सामने सायंकाळी होतात, यावेळी दव पडत असल्याने अडचणी येत असतात. पण आजचा सामना दुपारी असल्याने दवामुळे अधिक अडचण येणार नसून यामुळे संघाची रणनीतीही बदलणार आहे.  दरम्यान आजच्या सामन्यात नेमकी कोणत्या खेळाडूंवर भिस्त असणार आणि मैदानाची स्थिती कशी असेल हे पाहूया...


कसा आहे पिच रिपोर्ट?


या मैदानात झालेल्या याआधीच्या दुपारच्या सामन्यात राजस्थानच्या बटलरने धमाकेदार शतक झळकालवलं होतं. त्यात सामना दुपारी असल्याने दवाची अडचणही अधिक येणार नसल्याने आज  नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी घेण्याची शक्यता आहे. प्रथम फलंदाजी करुन एक मोठी धावसंख्या उभी करुन समोरच्या संघावर तणाव टाकून कमी धावसंख्येत रोखण्याची रणनीती नाणेफेक जिंकणाऱ्यांची असेल.


चेन्नई विरुद्ध हैदराबाद  अशी असेल ड्रीम 11 (CSK vs SRH Best Dream 11)


विकेटकीपर- निकोलस पूरन


फलंदाज- एडन मार्करम, अंबाती रायडू, रॉबिन उथप्पा,  केन विल्यमसन 


ऑलराउंडर- रवींद्र जाडेजा, मोईन अली, वॉशिंग्टन सुंदर,


गोलंदाज-  टी नटराजन, डी. ब्राव्हो, भुवनेश्वर कुमार 


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha