Sachin Tendulkar : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर(Sachin Tendulkar)च्या क्रिकेटच्या मैदानावरील खेळाचे अनेक चाहते आहेत. सध्या सचिन त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आहे. सचिन कधी 'मी डोलकर दर्याचा राजा' गाण्यावर धिरकतानाचा तर कधी मिसळ पाववर ताव मारतानाचा व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करतो. सचिननं नुकताच एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सचिन त्याच्या बेस्ट बसमधील प्रवासाबद्दलच्या खास आठवणी सांगताना दिसत आहे.
सचिननं सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये 315 नंबरची वांद्रे ते शिवाजी पार्क जाणारी बस दिसत आहे. या बसबद्दल सचिन म्हणाला, 'बऱ्याच दिवसांनी 315 नंबरची वांद्रे ते शिवाजी पार्क ही बस पाहिली. मी शिवाजी पार्कवर प्रॅक्टिस करण्यासाठी या बसमधून जात होतो. प्रॅक्टिस झाल्यानंतर संध्याकाळी घरी या बसमधून परत जाताना मला माझ्या आवडत्या शेवटच्या सिटवर बसायला खूप आवडत होते. बसमध्ये थंड हवा येत असल्यानं बऱ्याच वेळा झोप लागत होती आणि त्यामुळे बस स्टॉप देखील अनेक वेळा मिस व्हायचा. पण तेव्हा बसमधून प्रवास करताना खूप मजा येत होती.' या व्हिडीओला सचिननं कॅप्शन दिलं, '315 नंबरची खास गोष्ट'
सचिननं या बससोबतचे काही फोटो देखील शेअर केले आहेत. या फोटोला नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. माजी क्रिकेटपटू दिलीप दोशी यांनी देखील सचिननं शेअर केलेल्या व्हिडीओला कमेंट केली आहे.
हे देखील वाचा-
- PKBS Vs GT LIVE Score Updates: गुजरातच्या संघानं पंजाबच्या तोंडून विजय हिसकावला, राहुल तेवतिया ठरला हिरो
- IPL 2022: गुजरातविरुद्ध सामन्यात लियाम लिव्हिंगस्टोनची बॅट तळपली; सर्वात जलद अर्धशतक ठोकून वेधलं सर्वांचं लक्ष
- Shikhar Dhawan: टी-20 क्रिकेटमध्ये शिखर धवननं रचला इतिहास; विराट, रोहितलाही जमलं नाही ते त्यानं करून दाखवलं