Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad: सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या (SRH) विक्रमी लक्ष्याचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) आयपीएल सामन्यात 25 धावांनी पराभव झाला आहे. सनरायझर्सने तीन गड्यांच्या मोबदल्यात 287 धावा केल्या आणि त्याच मोसमात केलेल्या 277 धावांचा त्यांचाच विक्रम मोडला. प्रत्युत्तरात आरसीबीला सात गड्यांच्या मोबदल्यात 262 धावाच करता आल्या.
हैदराबादने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना 3 गडी गमावून 287 धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीनेही 6 गडी गमावून 262 धावा केल्या. हा सामना अवघ्या 25 धावांनी जिंकण्यात हैदराबादला यश आले. या सामन्यात अनेक विक्रम झाले. या हंगामात सनरायझर्स हैदराबादने पुन्हा एकदा आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम मोडीत काढला. त्याने आरसीबीविरुद्ध 3 गडी बाद 287 धावा केल्या. आयपीएलमधील ही सर्वात मोठी धावसंख्या आहे.
आरसीबी प्ले ऑफच्या फेरीत कसा पोहचू शकतो?
आरसीबीच्या संघांची स्थिती पाहता प्ले ऑफच्या पोहोचण्यासाठी किमान आठ विजय आवश्यक आहेत. आरसीबीने सात पैकी फक्त एकच सामना जिंकला आहे, त्यामुळे आरसीबीला आता आगामी सर्व सामने जिंकावे लागतील. तसेच सात सामने जिंकूनही दुसऱ्या संघाच्या कामगिरीवर आरसीबीला अवलंबून राहावे लागेल. आयपीएल 2016 मध्ये आरसीबीने पहिल्या सात पैकी पाच सामने गमावूनही अंतिम फेरीत प्रवेश केला. यावेळीही चाहत्यांना अशाच चमत्काराची प्रतीक्षा असेल. आरसीबीचा संघ 2009, 2011 आणि 2016 मध्ये फायनलमध्ये पोहोचला होता. मात्र जेतेपद पटकावण्यास त्यांना अपयश आले.
549 धावा, 38 षटकार, 81 चौकार
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळल्या गेलेल्या या सामन्यात आयपीएलच्या एका सामन्यात सर्वाधिक 549 धावा झाल्या. याआधी हा विक्रम हैदराबाद आणि मुंबई यांच्यातील सामन्याच्या नावावर होता, ज्यात 523 धावा झाल्या होत्या. रॉयस चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात एकूण 81 चौकार मारले गेले. या सामन्यात 43 चौकार आणि 38 षटकार दिसले. आयपीएलच्या इतिहासात एका सामन्यात सर्वाधिक चौकार मारण्याचा हा विक्रम आहे.
संबंधित बातम्या:
दिनेश कार्तिकने लगावला यंदाच्या आयपीएलमधील सर्वांत लांब षटकार; चेंडू थेट बाहेर, एकदा Video बघाच!
RCB vs SRH: 549 धावा, 38 षटकार, 81 चौकार; आरसीबी अन् हैदराबादच्या सामन्यात अनेक विक्रमांची नोंद
रोहित शर्माची भर मैदानात उतरली पॅन्ट...; पत्नी रितिकाची रिॲक्शन व्हायरल, Video एकदा पाहाच!
आगामी टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची लवकरच घोषणा; या 15 खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता