IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स आमने- सामने येणार आहेत. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज आरोन फिंच नव्या विक्रमाला गवसणी घालणार आहे. आयपीएलमध्ये आरोन फिंचनं आतापर्यंत 8 संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. या हंगामात तो कोलकाताच्या संघाकडून खेळणार आहे. म्हणजे, तो आयपीएलमध्ये नऊ संघाचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू ठरेल. आयपीएलमध्ये नऊ संघाचं प्रतिनिधित्व करणारा आरोन फिंच पहिला खेळाडू असेल.
फिंचनं आतापर्यंत कोणकोणत्या संघाचं प्रतिनिधित्व केलं?
आयपीएलमध्ये आरोन फिंचनं आतापर्यंत 8 संघाचं प्रतिनिधित्व केलंय. राजस्थान रॉयल्स (2010), दिल्ली (2011-12), पुणे वॉरिअर्स (2013), सनरायझर्स हैदराबाद (2014), मुंबई इंडियन्स (2015), गुजरात लाईन्स (2016-17), किंग्ज इलेव्हन पंजाब (2018), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (2020), कोलकाता नाईट रायडर्स (2022). आयपीएलच्या पंधराव्या हंगामात फिंच कोलकात्याच्या संघाचं प्रतिनिधित्व करणार आहे.
आयपीएलमधील आरोन फिंचची कारकिर्द
फिंचने आयपीएलमध्ये आतापर्यंत 87 सामने खेळले आहेत. दरम्यान, त्यानं 25.70 च्या सरासरीनं 2000 हून अधिक धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 14 अर्धशतकांचा समावेश आहे.
आयपीएलचा पहिल्या सामन्यात कोलकाता चेन्नईशी भिडणार
आयपीएलचा पंधरावा हंगामाला येत्या 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. तर, अंतिम सामना 29 मे रोजी खेळला जाणार आहे. या हंगामातील पहिला सामना चेन्नई- कोलकाता यांच्यात रंगणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. कोलकात्याच्या संघाचं नेतृत्व श्रेयस अय्यर करणार आहे. तर, चेन्नईच्या संघाची जबाबदारी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी संभाळत आहे.
हे देखील वाचा-
- IND vs SL : श्रीलंकेच्या पराभवानंतरही भारतीय खेळाडूंनी लकमलला का दिल्या शुभेच्छा? नेमकं कारण काय?
- IPL 2022: आयपीएलमध्ये सर्वाधिक प्लेऑफ सामने खेळणारा संघ कोणता? तुमची आवडती फ्रँचायझी कितव्या क्रमांकावर?
- एकाच एकदिवसीय सामन्यात शतकासह पाच विकेट्स, तीन अष्टपैलू खेळाडूंच्या नावावर खास विक्रमांची नोंद
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha