IPL 2022 Hardik Pandya NCA : आयपीएलचं बिगुल वाजले आहे, 26 मार्चपासून रणसंग्रमाला सुरुवात होत आहे. त्यापूर्वी भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू आणि गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या बंगळुरुमधील एनसीए (नॅशनल क्रिकेट अकादमी) मध्ये पोहचला आहे. आयपीएलपूर्वी हार्दिक पांड्याला आपली फिटनेस सिद्ध करावी लागणार आहे. पुढील दोन दिवसांत हार्दिकची फिटनेस चाचणी होणार आहे.
फिटनेस टेस्टमध्ये पास झाल्यानंतर हार्दिक पांड्याला आयपीएलमध्ये खेळण्याची मुभा मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे हार्दिकची भारतीय संघातही निवड झाली नव्हती. टी20 विश्वचषकानंततर हार्दिक पांड्या भारतीय संघाबाहेर आहे. आयपीएलपूर्वी हार्दिक पांड्या एनसीएममध्ये दाखल झाला आहे. हार्दिक पांड्याने सरावाला सुरुवात केली आहे. लवकरच हार्दिकची फिटनेस चाचणी होणार आहे.
आयपीएलमध्ये हार्दिक पांड्या गोलंदाजी करु शकतो की नाही? याचे उत्तर फिटनेस चाचणीनंतर मिळणार आहे. 28 मार्च रोजी हार्दिकच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सचा संघ लखनऊ सुपर जायंट्सविरोधात आपला पहिला सामना खेळणार आहे. बीसीसीआयमधील सुत्रांनी सांगितले की, पुढील दोन दिवस हार्दिक पांड्या एनसीएमध्ये असणार आहे. या दोन दिवसांत हार्दिक पांड्या वेगवेगळ्या फिटनेस चाचण्या देणार आहे.
26 मार्च रोजी शुभारंभ –
26 मार्च 2022 पासून आयपीएलच्या 15 व्या हंगामाला सुरुवात होणार आहेय चेन्नई आणि कोलकाता यांच्यात पहिला सामना होणार आहे. गुजरात संघाचा पहिला सामना 28 मार्च रोजी होणार आहे.
असा आहे गुजरातचा संघ -
शिलेदार – हार्दिक पंड्या (15 कोटी), राशिद खान (15 कोटी) शुभमन गिल (8 कोटी), मोहम्मद शमी (6.25 कोटी), जेसन रॉय (2 कोटी), लॉकी फर्ग्युसन (10 कोटी), अभिनव सदरंगानी (2.6 कोटी), राहुल तेवातिया (9 कोटी), नूर अहमद (30 लाख), साई किशोर (3 कोटी), डॉमनिक ड्रेक्स (1.10 कोटी), जयंत यादव (1.70 कोटी), विजय शंकर (1.40 कोटी), दर्शन नालकंडे (20 लाख), यश दयाल (3.20 कोटी), अल्झारी जोसेफ (2.40 कोटी), प्रदीप सांगवान (20 लाख), मॅथ्यू वेड (2.40 कोटी), वृद्धिमान साहा – (1.90 कोटी), डेविड मिलर – ( 3 कोटी), वरुण अरॉन- 50 (लाख रुपये), गुरकीरत मान सिंह- (50 लाख रुपये), नूर अहमद – (30 लाख रुपये), साईं सुदर्शन- 20 लाख रुपये