IPL 2023 GT vs MI : मुंबई आणि गुजरात संघामध्ये क्वालिफायर 2 चा सामना रंगणार आहे. यातील विजेता संघ रविवारी चेन्नईसोबत दोन हात करणार आहे. हार्दिक पांड्याच्या गुजरातचा चेन्नईकडून पराभव झाला.. तर मुंबईने लखनौचा पराभव करत क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केलाय. गतविजेता आणि पाच वेळा आयपीएच चषक जिंकणाऱ्या मुंबईमध्ये काटें की टक्कर पाहायला मिळणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये खराब सुरुवात करणारा मुंबईचा संघ चषकापासून फक्त दोन पावले दूर आहे. यंदाच्या हंगामात मुंबईच्या यशाची अनेक कारणे असतील.. त्यामधील प्रमुख कारणे जाणून घेऊयात... 


सांघिक कामगिरी - 


सांघिक कामिगिरी मुंबईची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. खराब सुरुवात कऱणाऱ्या मुंबईने दुसऱ्या टप्प्यात दमदार पुनरागमन गेले. 14 सामन्यापैकी आठ सामने जिंकून मुंबईने प्लेऑफमध्ये प्रवेश केला. त्यानंतर एलिमिनेटर सामन्यात लखनौचा दारुण पराभव करत क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केला. 


आकाश मधवाल- पीयूष चावला


मुंबईच्या यशामध्ये आकाश मधवाल आणि पीयूष चावला यांचा वाटा मोठा आहे. सुरुवातीच्या सामन्यात पीयूष चावला याने भेदक मारा केला. मुंबईकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजात पीयूष चावला पहिल्या स्थानावर आहे. तर आकाश मधवाल याने मागील दोन्ही सामन्यात मुंबईसाठी दमदार कामगिरी केली. एलिमिनेटर सामन्यात आकाशने पाच विकेट घेतल्या. तर अखेरच्या साखळी सामन्यात चार बळी घेतल्या. मुंबईला क्वालिफायर 2 मध्ये दाखल करण्यात  या दोन्ही गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली.


सूर्याची फलंदाजी - 


तिलक वर्मा, नेहल वढेरा, कॅमरुन ग्रीन यांनी मुंबईसाठी दमदार फलंदाजी केली. पण यांच्या कामगिरीत सातत्य दिसून आले नाही. सुरुवातीच्या सामन्यात सूर्यकुमार यादव भलेही अपयशी ठरला.. पण सूर्याची बॅट तळपायला लागल्यानंतर मुंबईची गाडीही रुळावर आली. सूर्यकुमार यादव याने एक शतक आणि चार अर्धशतकाच्या बळावर 544 धावा चोपल्या आहेत. त्याशिवाय कॅमरुन ग्रीन याने 422 धावा केल्यात. तर इशान किशन 454 धावांचा पाऊस पाडलाय. 



रोहित शर्माचे नेतृत्व - 


रोहित शर्माची बॅट शांत राहिली.. पण मैदानात त्याने आपल्या नेतृत्वात मुंबईला यशस्वी केलेय. रोहित शर्मा याचे नेतृत्वही तितकेच चांगले झाले. फलंदाजी, गोलंदाजीतील बदल असो अथवा फिल्डिंगमधील बदल.. रोहित शर्माच्या निर्णायाचा मुंबईला चांगला फायदा झालाय. 


मुंबईचा शानदार रेकॉर्ड, धोनीलाही नाही जमले ते रोहितने करुन दाखवले
यपीएलच्या सोळाव्या हंगामात मुंबईने अतिशय खराब सुरुवात केली होती. पण आता मुंबई सहाव्या चषकापासून फक्त दोन पावले दूर आहे. लखनौचा पराभव करत मुंबईने क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केला. या विजयासह मुंबईने मोठा विक्रम नोंदवलाय. मुंबई इंडियन्समध्ये आयपीएलमध्ये लागोपाठ सात नॉकआऊट (knock-outs) सामने जिंकले आहेत. आतापर्यंत एकाही संघाला असा कारनामा करता आलेली नाही. धोनीच्या चेन्नईलाही असा कारनामा करता आलेला नाही. यंदाच्या हंगामात मुंबईने दमदार कामगिरी केली. विशेषकरुन दुसऱ्या टप्प्यात मुंबईचा संघ रंगात आला. 30 एप्रिल 2023 रोजी मुंबई गुणतालिकेत नवव्या स्थानावर होता. 24 मे रोजी मुंबईने क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केलाय. चषकापासून मुंबई फक्त दोन पावले दूर आहे. क्वालिफायर दोनमध्ये मुंबईचा सामना गुजरातसोबत होणार आहे. महिनाभर मुंबईने चॅम्पियनप्रमाणे कामगिरी केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई संघाला प्रत्येक सामन्यात नवा मॅचविनर मिळाला.. त्यामुळे मुंबईने दमदार कामगिरी केली.