IPL 2022, GT vs LSG : गुजरात टायटन्स आपल्या IPL सामन्यांची सुरुवात करण्यासाठी सज्ज झाले आहेत. सीवीसी कॅपिटल्सने तब्बल 5 हजार 625 कोटी रुपये देऊन विकत घेतलेल्या या संघाची धुरा भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याकडे असून हार्दीकसह राशिद आणि शुभमन हे स्टार खेळाडू संघात आहेत. महालिलावात गुजरातने आणखी काही महारथीही संघात घेतले आहेत. दरम्यान स्टार खेळाडू राशिदवर नुकतीच संघाने एक महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. त्याला संघाचा उपकर्णधार ही जबाबदारी देण्यात आली आहे. गुजरात टायटन्सने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरुन ही माहिती शेअर केली आहे.
गुजरात टायटन्सने (Gujrat Titans) त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये हार्दीक आणि राशिदचा (Rashid Khan) फोटो शेअर करत लिहिलं आहे की, 'आमच्यासाठी या हंगामात राशिद खान उपकर्णधार असणार आहे.' गुजरातने महालिलावापूर्वीच तब्बल 15 कोटी मोजत राशिदला संघासाठी करारबद्ध केलं होतं.
" data-captioned data-default-framing width="400" height="400" layout="responsive">
असा आहे गुजरातचा संघ -
शिलेदार – हार्दिक पंड्या (15 कोटी), राशिद खान (15 कोटी) शुभमन गिल (8 कोटी), मोहम्मद शमी (6.25 कोटी), जेसन रॉय (2 कोटी), लॉकी फर्ग्युसन (10 कोटी), अभिनव सदरंगानी (2.6 कोटी), राहुल तेवातिया (9 कोटी), नूर अहमद (30 लाख), साई किशोर (3 कोटी), डॉमनिक ड्रेक्स (1.10 कोटी), जयंत यादव (1.70 कोटी), विजय शंकर (1.40 कोटी), दर्शन नालकंडे (20 लाख), यश दयाल (3.20 कोटी), अल्झारी जोसेफ (2.40 कोटी), प्रदीप सांगवान (20 लाख), मॅथ्यू वेड (2.40 कोटी), वृद्धिमान साहा – (1.90 कोटी), डेविड मिलर – ( 3 कोटी), वरुण अरॉन- 50 (लाख रुपये), गुरकीरत मान सिंह- (50 लाख रुपये), नूर अहमद – (30 लाख रुपये), साईं सुदर्शन- 20 लाख रुपये
हे देखील वाचा-
- IPL 2022, GT vs LSG : नवे संघ, नव्या रुपात अवतरणार मैदानात, गुजरात विरुद्ध लखनौची लढत, कधी, कुठे पाहाल सामना?
- IPL 2022: गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स मैदानात, 'या' खेळाडूंवर असेल सर्वाची नजर
- IPL 2022 : आयपीएलचे 70 सामने मुंबई-पुण्यात, MI-CSK वेगवेगळ्या ग्रुपमध्ये, पाहा कोणता संघ कोणत्या ग्रुपमध्ये?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha