CSK vs RCB : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील आजचा 49 वा सामना आहे. या सामन्यात रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपरकिंग्स (RCB vs CSK) हे दोन्ही संघ एकमेकांविरोधात मैदानात उतरले असून चेन्नईने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. एमएस दोनी पुन्हा कर्णधारपदावर आल्यानंतर आजही चेन्नई जिंकणार का? याकडे सर्व चेन्नई फॅन्सचे लक्ष आहे. तर बंगळुरुला विजयाची अत्यंत गरज असल्याने आजचा सामना चुरशीचा होण्याची दाट शक्यता आहे. आजचा सामना पुण्यातील एमसीए मैदानावर (MCA Ground, Pune) आतापर्यंतच्या काही सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणारा संघही विजयी झाला आहे. पण आज चेन्नईने गोलंदाजी घेतल्याने नेमकं काय होणार हे पाहावं लागेल.



आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघाच्या अंतिम 11 चा विचार करता बंगळुरु संघाने एकही बदल न करता मागील सामन्यात खेळवलेला तोच संघ आजही खेळवला आहे. तर चेन्नई सुपरकिंग्स संघाने मात्र एक महत्त्वाचा बदल करत सँटनरच्या जागी मोईन अलीला संधी दिली गेली आहे. तर नेमके कोणते खेळाडू खेळणार आहेत यावर एक नजर फिरवूया...


चेन्नई अंतिम 11


रॉबिन उथप्पा, ऋतुराज गायकवाड, डेवॉन कॉन्वे, मोईन अली, अंबाती रायडू, रवींद्र जाडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), ड्वेन प्रीटोरियस, महेश चौधरी, महेश तीक्ष्णा, सीमरजीत सिंह. 


बंगळुरु अंतिम 11 


फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), शाहबाज अहमद, महिपाल लोमरोर, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड.


हे देखील वाचा-