Shimron Hetmyer : राजस्थान रॉयल्सचा स्टार फलंदाज शिमरोन हेटमायर आयपीएल अर्ध्यावरच सोडून मायदेशी परतलाय. हेटमायर रविवारी सकाळी बायो बबलमधून बाहेर पडलाय. हेटमायरने मुंबईतून गुयानासाठी फ्लाईट पकडली. शिमरोन हेटमायर बायो बबलमधून जातानाचा व्हिडीओ राजस्थान रॉयल्सने सोशल मीडियावर पोस्ट केलाय.
शिमरोन आयपीएलमधून का निघाला?
शिमरोन हेटमायर पहिल्यांदाच बाप होणार आहे. कुटुंबाकडून पत्नीच्या डिलिव्हरीबाबत माहिती मिळताच हेटमायर मायदेशी परतला आहे.
राजस्थानने शेअर केला व्हिडीओ -
राजस्थान रॉयलने शिमरोन हेटमायर बायो बबलमधून बाहेर निघतानाचा व्हिडीओ पोस्ट केलाय. यामध्ये हेटमायर जाताना सहकारी खेळाडू त्याला निरोप देताना दिसत आहेत. जेम्स नीशम, युजवेंद्र चहल, डेरिल मिचेल यांनी हेटमायरला शुभेच्छाही दिल्या.
पुन्हा परतणार -
हेटमायर मुंबईतून गुयानासाठी रवाना झाला. बाळाच्या जन्मानंतर हेटमायर पुन्हा राजस्थान संघासोबत जोडला जाणार आहे. पण नेमका कधी परतणार, याबाबत कोणताही माहिती अद्याप समोर आलेली नाही. शिमरोन हेटमायर आज सकाळी मायदेशी परतला आहे. लवकर तो माघारी परतणार आहे, असे राजस्थानने आपल्या ट्विटमध्ये म्हटलेय.
पाहा राजस्थानचे ट्विट -
मॅचविनवर हेटमायर -
यंदाच्या हंगामात शिमोरन हेटमायर लयीत दिसत आहे. हेटमायरने वादळी खेळी करत राजस्थानला अनेकदा सामना जिंकून दिलाय. हेटमायरने फिनिशिंगची अचूक भूमिका बजावली आहे. आतापर्यंत झालेल्या 11 सामन्यात हेटमायरने 291 धावांचा पाऊस पाडलाय. 11 डावात हेटमायर सातवेळा नाबाद राहिलाय. हेटमायरने राजस्थानसाठी फिनिशिंग करताना 166.28 स्ट्राईक रेटने धावा चोपल्या आहेत.
दरम्यान, मुंबईच्या (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 52 व्या सामन्यात राजस्थानच्या संघानं पंजाबला पराभूत केलंय. या सामन्यात नाणेफेक जिंकून पंजाबच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, पंजाबच्या संघानं 20 षटकात 5 विकेट्स गमावून राजस्थानसमोर 190 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. प्रत्युत्तरात राजस्थानच्या संघानं 6 विकेट्स राखून पंजाबला पराभूत केलं. राजस्थानकडून यशस्वी जैस्वालनं (Yashasvi Jaiswal) 68 धावांची वादळी खेळी केली