SRH vs RCB : आज आयपीएलमध्ये (IPL 2022) दोन सामने पार पडणार आहेत. यातील पहिला सामना हा सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु (Sunrisers Hyderabad vs Royal challengers bangalore) या दोन संघात होणार आहे. गुणतालिकेचा विचार करता हैदराबादने 10 पैकी 5 सामने जिंकत 10 गुण खिशात घातले आहेत. ते सध्या सहाव्या स्थानावर आहे. तर बंगळुरु संघाने 11 पैकी 6 सामने जिंकत 12 गुणांसह चौथं स्थान मिळवलं आहे. दोन्ही संघाना पुढील फेरीत पोहचण्यासाठी आजचा विजय अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यात दोघांचा फॉर्म यंदा समसमान असल्यान आजचा सामना नक्कीच चुरशीचा होईल.


आज होणाऱ्या सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु (SRH vs RCB) या सामन्यात दोन्ही संघाकडून दमदार खेळाडूंची फौज मैदानात उतरणार यात शंका नाही. दोन्ही संघाकडून विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले जाणार असून आजचा हा सामना कधी आणि कुठे पाहू शकता, याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 


कधी आहे सामना?


आज 8 मे रोजी होणारा सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेजर्स बंगळुरु सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 3 वाजता नाणेफेक होईल.  


कुठे आहे सामना?


हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.


कुठे पाहता येणार सामना?


सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेजर्स बंगळुरु यांच्यातील आजचा सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल. 


हे देखील वाचा-