Gautam Gambhir, Rahul Sharma : विराट कोहलीबरोबर झालेल्या बाचाबाचीमुळे गौतम गंभीर चर्चेत होता. काहींनी यामध्ये गौतम गंभीर याची बाजू घेतली होती तर काहींनी गंभीरवर टीकास्त्र सोडले होते. पण आता गौतम गंभीर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. गौतम गंभीर याने माजी क्रिकेटपटूला मदत केली आहे. गौतम गंभीर याने राहुल शर्मा याला मोठी मदत केली आहे. राहुल शर्मा याने ट्वीट करत गौतम गंभीर याचे आभार मानले आहेत. त्याशिवाय गौतम गंभीर यू आर दी बेस्ट असेही म्हटलेय. राहुल शर्मा याच्या सासूच्या मदतीला गौतम गंभीर धावाला होता. राहुल शर्माच्या पोस्टनंतर गौतम गंभीर याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
ब्रेन हॅमरेजमुळे त्रस्त -
राहुल शर्मा याची सासू ब्रेन हॅमरेज या आजाराने त्रस्त होती.. प्रकृती अतिशय नाजूक झाली होती. अशावेळी गौतम गंभीर मदतीला धावला. माजी खेळाडू राहूल शर्मा याने ट्वीट करत गौतम गंभीरचे आभार व्यक्त केलेत. राहुल शर्मा याने सर्जरीनंतर सासूचा फोटो पोस्ट करत गंभीरसाठी खास पोस्ट केली आहे. राहुल शर्माच्या या पोस्टनंतर गौतम गंभीरवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
राहुल काय म्हणाला ?
मागील महिना खूपच कठीण होता. माझ्या सासूला ब्रेन हॅमरेज झाले होते...तिची प्रकृती अतिशय नाजूक होती. अशावेळीच गौतम गंभीर पाजी आणि त्याचा पीए गौरव अरोरा याचे धन्यवाद... कठीण परिस्थितीत मदत केली. त्यांनी सर्वोत्तम न्यूरोलॉसिस्ट आणि रुग्णालय मिळवून दिले. खूप कमी कालावधीत सर्जरी यशस्वी झाली. सासू आता ठीक आहे. गंगाराम रुग्णालय आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी अतिशय व्यवस्थित काळजी घेतली... सर्वांचे धन्यवाद... डॉ मनिष चुक यांचे खास आभार... धन्यवाद..!