Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Marathi News: सनरायझर्स हैदराबादने (SRH) पंजाब किंग्सवर (PBKS) 2 धावांनी रोमहर्षक विजय मिळवला आहे. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 20 षटकांत 182 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्जची सुरुवात चांगली झाली नाही कारण संघाने 20 धावांतच आघाडीच्या तीन फलंदाजांच्या विकेट्स गमावल्या. 


सॅम कुरन आणि सिकंदर रझा यांनी अनुक्रमे 29 आणि 28 धावा करत पंजाबचे पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते अयशस्वी ठरले. हैदराबादच्यावतीने विशेषत: भुवनेश्वर कुमार आणि कर्णधार पॅट कमिन्स यांनी तगडी गोलंदाजी करत पंजाबच्या फलंदाजांना दडपणाखाली आणले. पंजाबच्या शशांक सिंग आणि आशुतोषने शर्मा यांनी आजही स्फोटक फलंदाजी केली. मात्र तरीही संघाला विजय मिळवून देण्यात दोघांना अपयश मिळाले.


पंजाब सतत विकेट गमावत होता, त्यामुळे संघाला शेवटच्या 5 षटकांत 78 धावा कराव्या लागल्या. अधिक धावा करण्याच्या दबावाखाली जितेश शर्माने 16व्या षटकांत 11 चेंडूत 19 धावा फटकावल्यानंतर पुढच्याच चेंडूवर आपली विकेट गमावली. पंजाबच्या फलंदाजांनी पुढच्या 2 षटकांत 28 धावा केल्या, पण तरीही त्यांना 18 चेंडूत 50 धावांची गरज होती. शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा ही जोडी पुन्हा एकदा सामन्याला कलाटणी देण्याच्या तयारीत होती. पण त्यांच्यासमोर शेवटच्या 6 चेंडूत 29 धावा करण्याचे खडतर आव्हान होते. 






नितीश रेड्डी चमकला-


हैदराबाद संघाचा 20 वर्षीय नितीश रेड्डीने 37 चेंडूत 64 धावांची शानदार खेळी खेळली, ज्यामध्ये त्याने 4 चौकार आणि 5 षटकारही ठोकले. 


शशांक सिंग-आशुतोष शर्माच्या जोडीने पुन्हा सामना रोमांचक केला-


गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात शशांक सिंग आणि आशुतोष या जोडीने शेवटच्या षटकांमध्ये शानदार फलंदाजी करत पंजाब किंग्सला हरवलेला सामना जिंकून दिला. यावेळीही त्यांच्या जोडीने शेवटच्या षटकांमध्ये पंजाबला विजयाच्या जवळ आणले होते. एकीकडे शशांक सिंगने 25 चेंडूत 46 धावा केल्या. तर आशुतोषने 15 चेंडूत 33 धावा केल्या, पण पंजाबचा विजय निश्चित करता आला नाही. हैदराबादच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर भुवनेश्वर कुमारने 2 महत्वाचे बळी घेतले. तर पॅट कमिन्स, टी नटराजन, नितीश रेड्डी आणि जयदेव उनाडकट यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.


संबंधित बातम्या:


ट्रॅव्हिस हेडची पत्नीची पुन्हा एकदा रंगली चर्चा; सौंदर्य पाहून नेटकरी घायाळ, पाहा Photo


Romario Shepherd: दिल्लीच्या गोलंदाजांचा पालापाचोळा करणाऱ्या रोमारिओ शेफर्डची पत्नी आहे टीव्ही अँकर, पाहा Photo's


Mumbai Indians Rohit Sharma: 'हेच हवं आहे...'; मुंबई इंडियन्सच्या पहिल्या विजयानंतर रोहितने हार्दिक पांड्याबाबत केलं विधान