Romario Shepherd: दिल्लीच्या गोलंदाजांचा पालापाचोळा करणाऱ्या रोमारिओ शेफर्डची पत्नी आहे टीव्ही अँकर, पाहा Photo's
आयपीएलमध्ये पहिल्यांदाच मुंबई इंडियन्सकडून सामना खेळणाऱ्या रोमारिओ शेफर्डने स्फोटक खेळीने प्रेक्षक अवाक् झाले. (Image Source- IPL)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसातव्या क्रमांकावर आलेल्या रोमारिओ शेफर्ड या कॅरेबियन फलंदाजाने अवघ्या 10 चेंडूत झटपट 30 धावा केल्या. त्यामुळे हार्दिक पांड्याच्या संघाला दिल्लीचा 29 धावांनी पराभव करून मोसमातील पहिला विजय नोंदवण्यात यश आले.(Image Source- IPL)
दिल्लीविरुद्ध स्फोटक खेळी खेळणारा रोमारिओ शेफर्ड सामनावीर ठरला.(Image Source- IPL)
रोमारिओ शेफर्ड उजव्या हाताने मध्यम वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू आहे. रोमारिओ शेफर्डची वैयक्तिक आयुष्य आणि त्याच्या पत्नीची देखील कायम चर्चा असते.(Image Source- Social Media)
रोमारिओ शेफर्डची पत्नी टिया ट्रान्सिया जोसेफ ही व्यवसायाने मॉडेल आणि टीव्ही अँकर आहे.
रोमारिओ शेफर्ड आणि टिया ट्रान्सिया जोसेफला एक मुलगाही आहे. ती तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर रोमारिओसोबतचे अनेक फोटो अपलोड करत असते.
ट्रान्सियाचे सोशल मीडियावर दोन हजारांहून अधिक फॉलोअर्स असून ती अनेकदा आपल्या कुटुंबासोबतचे फोटो अपलोड करत असते.
रोमारिओ शेफर्डला मुंबई इंडियन्सने ट्रान्सफर विंडोपूर्वी लखनौ संघातून त्याच्या मूळ किंमत 50 लाख रुपयांमध्ये खरेदी केले होते. आयपीएल 2023 मध्ये तो फक्त एकच सामना खेळला होता.
रोमारिओ शेफर्डच्या 10 बॉलमध्ये 39 धावा- दिल्ली कॅपिटल्सनं नॉर्खियाला अखेरची ओव्हर टाकण्याची संधी दिली होती. मात्र, नॉर्खियाची बॉलिगं रोमारियो शेफर्डनं फोडून काढली. रोमारिओ शेफर्डनं मुंबई इंडियन्सकडून पहिलीच मॅच खेळली. यामध्ये त्यानं दिल्लीच्या बॉलिंगला फोडून काढलं. शेफर्डनं 10 बॉलमध्ये 39 धावा केल्या. रोमारिओ शेफर्डनं 4 षटकार आणि 3 चौकारांच्या जोरावर 39 धावा केल्या. रोमारियो शेफर्डनं बॉलिंग करताना डेव्हिड वॉर्नरला देखील बाद केलं.
कोण आहे रोमारिओ शेफर्ड?-रोमारिओ शेफर्ड हा वेस्ट इंडिजचा ऑलराऊंडर खेळाडू आहे. शेफर्ड हा टी-20 क्रिकेटमध्ये महत्त्वाचा खेळाडू मानला जातो. शेफर्ड टी-20 क्रिकेटमध्ये 150 च्या स्ट्राइक रेटनं फलंदाजी करतो. शेफर्डनं वेस्ट इंडिजसाठी 31 मॅचमध्ये प्रतिनिधीत्व केलं आहे. त्यामध्ये त्यानं 153.57 च्या स्ट्राइक रेटनं 301 धावा केल्या आहेत.