Preity Zinta In KKR vs PBK Match : पंजाब आणि कोलकाता यांच्यामध्ये मोहालीच्या मैदानावर सामना सुरु आहे. नाणेफेक गमावल्यानंतर पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 191 धावांचा डोंगर उभारला.  पंजाब संघाचे मनोबल वाढवण्यासाठी संघाची मालकीन प्रीती झिंटा स्टेडिअममध्ये आली होती. बॉलिवूड अभिनेत्री आणि पंजाब संघाची मालक प्रीती झिंटा हिचे स्टेडिअममधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 
 
बॉलिवूड अभिनेत्री आणि पंजाब किंग्स संघाची मालकिन प्रीती झिंटा पंजाब संघाला सपोर्ट करण्यासाठी मोहालीच्या मैदानात पोहचली. पंजाबच्या खेळाडूंचे मनोबल वाढवताना प्रीती झिंटाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. प्रत्येक आयपीएल सामन्यावेळी प्रीती झिंटा संघाचे मनोबल वाढवता दिसते. सेलेब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.. यंदाही प्रीती झिंटा हिने पंजाबच्या पहिल्या सामन्याला उपस्थिती दर्शवली आहे.   






































हिट चित्रपटांमध्ये केलं काम
प्रीतीनं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 1998 मध्ये रिलीज झालेल्या दिल से या चित्रपटामधून प्रीतीनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. तसेच तिनं सोल्जर चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली.  कल हो ना हो, कभी अलविदा ना कहना, कोई मिल गया, सलाम नमस्ते, वीर जारा या चित्रपटांमधील प्रीतीच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 


प्रीतीच्या अफेर्सची चर्चा 
प्रीतीचं नाव अनेकवेळा बिझनेसमॅन तसेच क्रिकेटर्ससोबत जोडलं गेलं. प्रीतीनं कभी अलविदा न कहना आणि झूम बराबर झूम या चित्रपटांमध्ये अभिषेक बच्चनसोबत काम केलं. त्यानंतर दोघे एकमेकांना डेट करत आहेत, अशी चर्चा सुरु झाली. तसेच प्रीतीचं नाव क्रिकेटर ब्रेट ली, अभिनेता-मॉडल मार्क रॉबिन्सन आणि बिझनेसमॅन नेस वाडिया यांच्यासोबत देखील जोडण्यात आलं.  प्रीतीनं 2016 मध्ये प्रितीने जीन गुडइनफसोबत लग्नगाठ बांधली.