PBKS vs KKR, IPL 2023 : भानुका राजपक्षेचे अर्धशतक आणि सॅम करनच्या फिनिशिंगमुळे पंजाब किंग्सने 191 धावांपर्यंत मजल मारली. कोलकात्याला विजयासाठी 192 धावांचे आव्हान मिळाले आहे. पंजाबने निर्धारित 20 षटकात पाच विकेटच्या मोबदल्यात 191 धावा केल्या. कोलकात्याकडून टीम साऊदीने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.
भानुका राजपक्षेचा अर्धशतकी तडाखा -
भानुका राजपक्षे याने कोलकाताच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. राजपक्षे याने अवघ्या 32 चेंडूत 50 धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने दोन षटकार आणि 5 चौकार लगावले. राजपक्षे याने कर्णधार शिखर धवनसोबत 80 पेक्षा जास्त धावांची भागिदारी केली. शिखर आणि राजपक्षे यांनी मोठ्या धावसंख्येचा पाया रचला.
शिखर धवनची संयमी खेळी -
कर्णधार शिखर धवन याने कर्णधाराला साजेशी फलंदाजी केली. एका बाजूला प्रभसिमरन, राजपक्षे आणि जितेश शर्मा धावांचा पाऊस पाडत होते. तेव्हा धवन याने दुसरी बाजू लावून धरली होती. धवन याने संयमी 40 धावांची खेळी केली. धवन याने 29 चेंडूत 40 धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने सहा चौकार लगावले.
खेळी छोटी पण प्रभाव मोठा -
प्रभसिमरन सिंह आणि जितेश शर्मा यांनी छोटेखानी पण प्रभावी खेळी केली. दोघांना मोठी खेळी करता आली नाही , पण प्रभावी खेळी केली. प्रभसिमरन याने सलामीला येत अवघ्या 12 चेंडूत 23 धावांचा पाऊस पाडला. यावेळी त्याने दोन चौकार आणि दोन षटकार लगावले. तर जितेश शर्माने 11 चेंडूत दोन षटकाराच्या मदतीने 21 धावा केल्या. संघाची धावसंख्या वाढवण्यात या दोन खेळीने महत्वाची भूमिका बजावली.
टीम साऊदीचे अर्धशतक -
टीम साऊदीने सर्वाधिक विकेट घेतल्या पण तो सर्वात महागडा गोलंदाज ठरला. चार षटकात साऊदीने 54 धावा खर्च केल्या. त्याशिवाय सुनील नारायण याने 40 तर शार्दुल ठाकूर याने 43 धावा खर्च केल्या. साऊदीने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. तर उमेश यादव, नारायण आणि वरुण चक्रवर्ती यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.
नाणेफेक -
कोलकात्याचा कर्णधार नीतीश राणा याने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण प्रभसिमरन सिंह आणि शिखर धवन यांनी दमदार सलामी दिली.
PBKS vs KKR Live Score : नीतीश राणाच्या नेतृत्वात कसा आहे कोलकाता संघ ?
रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), मनदीप सिंह, नीतीश राणा (कर्णधार), रिंकू सिंह, आंद्रे रसेल, शार्दुल ठाकुर, सुनील नरेन, टिम साउदी, अनुकुल रॉय, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती
PBKS vs KKR Live Score: पंजाब किंग्सचा कसाय संघ ?
शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंह (विकेटकीपर), भानुका राजपक्षे, जितेश शर्मा, शाहरुख खान, सॅम करन, सिकंदर रजा, नाथन एलिस, हरप्रीत बराड, राहुल चाहर, अर्शदीप सिंह