PBKS vs SRH IPL 2024: सनरायझर्स हैदराबादची पंजाब किंग्सवर मात; 2 धावांनी मिळवला विजय

PBKS vs SRH IPL 2024: पंजाब किंग्स आणि सनराझर्स हैदराबाद यांच्यात सामना झाला.

मुकेश चव्हाण Last Updated: 09 Apr 2024 11:17 PM
हैदराबादचा 2 धावांनी विजय

सनरायझर्स हैदराबादचा 2 धावांनी विजय मिळवला आहे. 

पंजाबची सहावी विकेट पडली

जितेश शर्मा 16 व्या षटकात प्रथम द्विशतक आणि नंतर षटकार मारल्यानंतर बाद झाला. जितेश लेग साइडवर नितीश रेड्डीकरवी झेलबाद झाला. जितेश 11 चेंडूत 19 धावा करून बाद झाला. पंजाबने 114 धावांवर सहावी विकेट गमावली.

पंजाब किंग्सला जिंकण्यासाठी 183 धावांचं आव्हान

सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्सला जिंकण्यासाठी 183 धावांचं आव्हान दिलं आहे.

नितीश रेड्डीचे अर्धशतक

नितीश रेड्डीने 15 व्या षटकात 22 धावा करत सामन्याचे चित्र पुन्हा बदलले आहे. हरप्रीत ब्रारच्या या षटकात रेड्डीने दोन षटकार आणि दोन चौकार लगावले. रेड्डी आता 35 चेंडूत 63 धावांवर आहे. त्याच्यासोबत अब्दुल समद पाच चेंडूत 10 धावांवर खेळत आहे. 15 षटकांनंतर हैदराबादची धावसंख्या 5 विकेटवर 133 धावा आहे.

हैदराबादला चौथा धक्का; राहुल त्रिपाठी माघारी

हैदराबाद संघाला चौथा झटका बसला आहे. राहुल त्रिपाठी माघारी परतला आहे. सध्या नितीश रेड्डी आणि हेनरिक क्लासेन फलंदाजी करत आहे.

हैदराबादची धावसंख्या 63-3

9 षटकांनंतर सनरायझर्स हैदराबादची धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 63 धावा आहे. 

अर्शदीपचा भेदक मारा; हैदराबादचे तीन गडी बाद

अर्शदीप सिंगच्या भेदक माऱ्यासमोर हैदराबादचे फलंदाज गारद झाले. अर्शदीपने एकाच षटकांत दोन विकेट्स घेतल्या. एडम मार्करमला एकही धावा करता आली नाही.

हैदराबादला दुसरा धक्का; जितेश शर्मा बाद

हैदराबादचा फलंदाज जितेश शर्मा बाद झाला आहे. अर्शदीप सिंगने त्याला झेलबाद केले.

हैदराबादला पहिला धक्का; ट्रेव्हिस हेड माघारी

हैदराबादला पहिला धक्का बसला आहे. ट्रेव्हिस हेड बाद झाला आहे. 





सनरायझर्स हैदराबादची प्लेइंग इलेव्हन-

ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (सी), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट आणि टी नटराजन.

पंजाब किंग्सची प्लेइंग इलेव्हन-

शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), सॅम कुरन, सिकंदर रझा, शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, राहुल चहर आणि अर्शदीप सिंग.

पंजाब किंग्सचा नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय

पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.





सनराजर्स हैदराबादचे संभाव्य 11 शिलेदार 

अभिषेक शर्मा, ट्रॅविस हेड, एडन मार्कराम, शाहबाज अहमद, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी/वाशिंगटन सुंदर, अब्दुल समद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, मयंक मारकंडे, जयदेव उनादकट 


इम्पॅक्ट प्लेयर- उमरान मलिक.

पंजाब किंग्सची संभाव्य प्लेईंग 11 

शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), प्रभसिमरन सिंह, सॅम कर्रन, जितेश शर्मा (विकेटकीपर), शशांक सिंह, सिकंदर रजा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कगिसो रबाडा, अर्शदीप सिंह.


इम्पॅक्ट प्लेयर- आशुतोष शर्मा.


 

खेळपट्टी कशी असेल?

मुल्लानपूर महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजी आणि गोलंदाजांना सपोर्ट करणारी संतुलित आहे. पण या मैदानावर जास्त फलंदाजांना मदत मिळू शकते. फिरकी गोलंदाजापेक्षा वेगवान गोलंदाजांना जास्त विकेट मिळण्याची शक्यता आहे. या मैदानावर पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये सामना झाला. या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 174 धावा केल्या. दिल्लीने दिलेल्या आव्हानाचा सामना करताना पंजाबने सनसनाटी विजय मिळवला.

पार्श्वभूमी

PBKS vs SRH IPL 2024: आज पंजाब किंग्स (PBKS) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात सामना झाला. या सामन्यात हैदराबादने 2 धावांनी विजय मिळवला आहे. 





- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.