Umran Malik: आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये फ्रंचायझींनी अनेक युवा खेळाडूंवर बोली लावली. त्यापैकी बऱ्याच खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली आहे. ज्यात सनरायजर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकच्या नावाचा समावेश आहे. त्याची कामगिरी पाहून अनेक दिग्गज खेळाडूंनी त्याच्या पाठीवर शब्बासकीची थाप मारली आहे. एवढेच नव्हेतर ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकात त्याला भारतीय संघात सामील करावं, अशा मागणींनी जोर धरला आहे. परंतु, क्रिडाविश्वामध्ये चर्चेचा विषय ठरलेला उमरान मलिका क्रिकेट प्रवास कसा होता? कशामुळं तो प्रकाश झोतात आला? यावर एक नजर टाकुयात.
500 रुपयांसाठी खेळायचा सामना
22 वर्षीय उमरान मलिकसाठी आयपीएलचा प्रवास सोपा नव्हता. त्यानं वयाच्या 17 व्या वर्षापर्यंत कोणतीही स्पेशल कोचिंग घेतली नाही. केवळ टेनिस बॉलनं क्रिकेट खेळलं आहे. जिथे त्याला एक सामना खेळण्यासाठी 500 ते 1000 रुपयांपर्यंत मानधन मिळायचे, असं म्हटलं जातं
उमरान मलिकची आयपीएलमध्ये एन्ट्री कशी झाली?
आयपीएलच्या मागच्या हंगामात उमरान मलिक हैदराबादच्या संघाचा नेट बॉलर होता. दरम्यान, हैदरबादचा डावखुरा गोलंदाज टी.नटराजन दुखापतीमुळं संघाबाहेर झाला. त्याच्या ऐवजी उमरान मलिकला हैदराबादच्या संघात संधी मिळाली. या संधीचं त्यानं सोन करून दाखवलं. त्यानं मागच्या हंगामात हैदराबादसाठी केवळ तीन सामने खेळले. पण हैदराबादच्या संघव्यवस्थापनानं त्याच्यातली गुणवत्ता ओळखली होती. आणि त्यांनी फेब्रुवारीच्या मेगा ऑक्शनआधीच केन विल्यमसन आणि आणि अब्दुल समद या दोघांसह चार कोटींची घसघशीत रक्कम देऊन उमरान मलिकलाही आपल्या संघात रिटेन केलं.
उमरान मलिक बनला वेगाचा बादशाह
सुरुवातीला उमरान मलिक अनेकांच्या नजरेत भरला तो त्याच्या भन्नाट वेगामुळे. यंदाच्या आयपीएलमध्ये प्रत्येक सामन्यात वेगवान चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजाला खास पुरस्कार दिला जातो. सनरायझर्स हैदराबादच्या गेल्या आठ सामन्यात सलग आठ वेळा दीडशे किलोमीटर्सपेक्षा जास्त वेगानं गोलंदाजी करून उमरान मलिकनं हा पुरस्कार पटकावलाय. याच वेगाच्या जोरावर उमरान मलिकनं आतापर्यंत आठ सामन्यात 12 च्या सरासरीनं तब्बल 15 विकेट्स घेतल्या आहेत.
उमरान मलिकला आंतराष्ट्रीय क्रिकेट संघात जागा मिळेल का?
आयपीएलनं आजवर अनेक खेळाडू भारतीय संघाला दिले आहेत. हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमरा, कृणाल पंड्या, शार्दूल ठाकूर याशिवाय अलिकडेच संघात आलेले सूर्यकुमार यादव, वरुण चक्रवर्ती, वेंकटेश अय्यर, टी. नटराजन हे सगळे आयपीएलनं दिलेले हिरे आहेत. याच यादीत आता उमरान मलिकचा समावेश होतो का हे पहावं लागेल.
हे देखील वाचा-