IPL 2022: दिल्लीविरुद्ध मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळण्यात आलेल्या आयपीएल 2022 च्या 41 व्या सामन्यात कोलकात्याचा अष्टपैलू खेळाडू सुनील नारायणनं ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली आहे. या सामन्यात दिल्लीच्या ललित यादवला बाद करून त्यानं आयपीएलमध्ये 150 विकेट्स घेण्याचा पराक्रम केलाय. आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा तो तिसरा विदेशी गोलंदाज ठरला आहे. 

दिल्लीविरुद्ध सुनील नारायणनं त्याच्या तिसऱ्या षटकात ललित यादवच्या रुपात आयपीएलमधील 150 वा विकेट्स घेतला. आयपीएलच्या इतिहासात 150 विकेट्स घेणारा सुनील नारायण 9 वा गोलंदाज ठरला आहे आणि तिसरा विदेशी खेळाडू ठरला आहे. तर, सहावा फिरकी गोलंदाज ठरला आहे. विदेशी खेळाडूंमध्ये वेगवान गोलंदाज ड्वेन ब्राव्हो आणि लसिथ मलिंगा यांनाच अशी कामगिरी करता आली आहे. 

आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांची यादी-

क्रमांक गोलंदाजाचं नाव सामने विकेट्स
1 ड्वेन ब्राव्हो 159 181
2 लसिथ मलिंगा 122 170
3 अमित मिश्रा 154 166
4 युजवेंद्र चहल 122 157
5 आर. अश्विन 175 152
6 भुवनेश्वर कुमार 140 151
7 हरभजन सिंह 153 150
8 सुनील नारायण 143 150

 

दरम्यान, सुनील नारायणनं कोलकात्याकडून 2012 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हापासून तो कोलकात्याच्या संघाचा भाग आहे. आयपीएलच्या मेगा ऑक्शनपूर्वी कोलकात्याच्या संघानं त्याला रिटेन केलं होतं. त्यानं आतापर्यंत कोलकात्यासाठी 143 सामने खेळले आहे. ज्यात त्यानं 24.66 सरासरीनं 150 विकेट्स घेतल्या आहेत. 

हे देखील वाचा-