PBKS vs KKR, IPL 2023 Live : पंजाबचा सात धावांनी विजय

PBKS vs KKR Live Score, IPL 2023: पंजाबचा संघ अनुभवी शिखर धवनच्या नेतृत्वात तर कोलकाताचा संघाची कमान युवा नितीश राणाच्या हाती असेल.

नामदेव कुंभार Last Updated: 01 Apr 2023 07:59 PM
पंजाबचा सात धावांनी विजय

डकवर्थ लुईस नियमांनुसार पंजाबचा सात धावांनी विजय

पंजाब आणि कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय

पंजाब आणि कोलकाता यांच्यातील सामन्यात पावसाचा व्यत्यय आलाय. कोलकाता सात बाद 146 धावा.... शार्दुल ठाकूर आणि नारायण मैदानात

कोलकात्याला सातवा धक्का, अय्यर बाद

अर्शदीप सिंह याने मोक्याच्या क्षणी जम बसलेल्या व्येंकटेश अय्यरला बाद केले. 

कोलकात्याला मोठा धक्का, रसेल बाद

मोक्याच्या क्षमी कोलकात्याला मोठा धक्का बसला आहे. रसेल बाद झाला आहे.. कोलकाता 6 बाद 130 धावा

वेंकटेश अय्यर आणि रसेलची फटकेबाजी

वेंकटेश अय्यर आणि रसेलची फटकेबाजी, सामना रोमांचक स्थितीत पोहचला आहे. कोलकात्याला विजयासाठी प्रति षटक 12 धावांची गरज

रिंकू सिंह बाद, कोलकात्याला पाचवा धक्का

राहुल चाहरने रिंकू सिंह याला बाद करत पाचवा धक्का दिला. रिंकू सिंह याला मोठी खेळी करता आली नाही.

कोलकात्याला मोठा धक्का, कर्णधार राणा बाद

सिंकदर रजाने कोलकात्याच्या कर्णाधाराला बद करत पंजाबला मोठं यश मिळवून दिले. 

कोलकात्याला तिसरा धक्का, गुरबाज बाद

कोलकात्याला तिसरा धक्का बसला आहे. गुरबाज 22 धावा काढून बाद झालाय.  

अर्शदीपने कोलकात्याला दोन धक्के दिले

अर्शदीप सिंह याने कोलकात्याला सुरुवातीलाच दोन धक्के दिले आहेत. अनुकुल रॉय आणि मनदीप सिंह यांना बाद करत पंजाबला चांगली सुरुवात करुन दिली.

कोलकात्याला दुसरा धक्का, अनुकुल रॉय बाद

अनुकुल रॉयच्या रुपाने कोलकात्याला दुसरा धक्का बसला... चार धावा काढून अनुकूल बाद झाला

कोलकात्याला पहिला धक्का, मनदीप सिंह बाद

कोलकात्याला पहिला धक्का, मनदीप सिंह बाद

पंजाबची 191 धावांपर्यंत मजल

भानुका राजपक्षेचे अर्धशतक आणि सॅम करनच्या फिनिशिंगमुळे पंजाब किंग्सने 191 धावांपर्यंत मजल मारली. कोलकात्याला विजयासाठी 192 धावांचे आव्हान मिळाले आहे. पंजाबने निर्धारित 20 षटकात पाच विकेटच्या मोबदल्यात 191 धावा केल्या. कोलकात्याकडून टीम साऊदीने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.

टीम साऊदीचे अर्धशतक

टीम साऊदीने सर्वाधिक विकेट घेतल्या पण तो सर्वात महागडा गोलंदाज ठरला. चार षटकात साऊदीने 54 धावा खर्च केल्या. त्याशिवाय सुनील नारायण याने 40 तर शार्दुल ठाकूर याने 43 धावा खर्च केल्या. साऊदीने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. तर उमेश यादव, नारायण आणि वरुण चक्रवर्ती यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली. 

सिंकदर रजा बाद, नारायणने केला अडथळा दूर

सिकंदर रजाला बाद करत नारायण याने पंजाबला पाचवा धक्का दिला

पंजाबला चौथा धक्का, कर्णधार शिखर तंबूत

पंजाबला चौथा धक्का बसला आहे. कर्णधार शिखर धवन याचा अडथळा वरुण चक्रवर्तीने दूर केलाय.  

पंजाबला तिसरा धक्का, जितेश बाद

पंजाबला तिसरा धक्का, जितेश बाद

PBKS vs KKR Live Score : पंजाब किंग्सने 12 षटकात केल्या 121 धावा

PBKS vs KKR Live Score : पंजाब किंग्सने 12 षटकात केल्या 121 धावा

उमेश यादवने दिला पंजाबला दुसरा धक्का

उमेश यादवने दिला पंजाबला दुसरा धक्का. राजपक्षे अर्धशतकानंतर बाद झाला.

राजपक्षेचे दमदार अर्धशतक

पंजाबचा राजपक्षे याने दमदार फलंदाजी केली. राजपक्षे यांने 30 चेंडूत अर्धशतक झळकावलेय. राजपक्षे आणि धवन यांनी 80 धावांची भागिदारी केली आहे. धवन सध्या 34 धावांवर खेळत आहे.

पंजाबची दमदार सुरुवात

पंजाबने दमदार सुरुवात केली आहे. राजपक्षे आणि शिखर धवन यांनी विस्फोटक फलंदाजी केली. राजपक्षे 40 तर शिखर 16 धावांवर खेळत आहे. पंजाब 8 षटकानंतर एक बाद 77 धावा

PBKS vs KKR Live Score : प्रभसिमरन आणि धवन कऱणार ओपनिंग

पंजाबसाठी शिखर धवन आणि प्रभसिमरन सिंह ओपनिंगसाठी मैदानात उतरले आहेत. उमेश यादव कोलकात्यासाठी पहिले षटक फेकत आहे.  

कसेय मोहालीचे मैदान

PBKS vs KKR Live Score: पंजाब किंग्सचा कसाय संघ ?

शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंह (विकेटकीपर), भानुका राजपक्षे, जितेश शर्मा, शाहरुख खान, सॅम करन, सिकंदर रजा, नाथन एलिस, हरप्रीत बराड, राहुल चाहर, अर्शदीप सिंह

PBKS vs KKR Live Score : नीतीश राणाच्या नेतृत्वात कसा आहे कोलकाता संघ ? 

रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), मनदीप सिंह, नीतीश राणा (कर्णधार), रिंकू सिंह, आंद्रे रसेल, शार्दुल ठाकुर, सुनील नरेन, टिम साउदी, अनुकुल रॉय, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती


 

कोलकाताने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

कोलकाता संघाचा कर्णधार नितीश राणा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

कशी आहे खेळपट्टी?

मोहालीची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल मानली जात आहे. येथील मैदान लहान असल्यामुळे येथे जास्त चौकार-षटकार मारले जातात. येथे झालेल्या सहा टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चा वेळा 200 हून अधिक धावसंख्या करण्यात आली होती. या मैदानावर नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा झाला. 

लाईव्ह सामना कुठे पाहाल?

स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग 'Jio Cinema' अॅपवर उपलब्ध असेल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

कोलकाता संघाची स्थिती

कोलकातासाठी अडचण म्हणजे श्रेयस अय्यरच्या पाठीच्या दुखापतीमुळे तो सध्या या सामन्यातून बाहेर आहे. तसेच दुसरा दिग्गज फलंदाज जॉनी बेअरस्टो ही जॉनी बेअरस्टो दुखापतीमुळे सामन्यासाठी उपलब्ध नसल्याने तो आयपीएल 2023 च्या संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे. जॉनी बेअरस्टोच्या जागी पंजाबने 27 वर्षीय ऑस्ट्रेलियन खेळाडू मॅथ्यू शॉर्टचा समावेश करण्यात आला आहे. टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजीसोबतच तो ऑफ-स्पिन गोलंदाजीही करतो.

कशी आहे खेळपट्टी?

मोहालीची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल मानली जात आहे. येथील मैदान लहान असल्यामुळे येथे जास्त चौकार-षटकार मारले जातात. येथे झालेल्या सहा टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चा वेळा 200 हून अधिक धावसंख्या करण्यात आली होती. या मैदानावर नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा झाला. 




 


पंजाब संघाची स्थिती

आयपीएल 2023 मध्ये मयंक अग्रवालच्या जागी यंदा शिखर धवनकडे पंजाब किंग्सचं कर्णधारपद आहे. शिखरच्या संघात अनेक दमदार खेळाडूंचा समावेश आहे. पंजाबच्या संघात भानुका राजपक्षे, सिकंदर रझा, सॅम करण आणि शाहरुख खानसारखे खेळाडू आहेत. हे सर्वजण चांगल्या फलंदाजीसाठी ओळखले जातात. त्यांच्याशिवाय अर्शदीप आणि नॅथन एलिस यांनी गोलंदाजीमुळे संघाकडून चाहत्यांना अपेक्षा आहेत. 

पार्श्वभूमी

IPL 2023, PBKS vs KKR Match Preview : आयपीएल 2023 मधील दुसरा सामना आज पंजाब किंग्स (Punjab Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात रंगणार आहे. पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर हा सामना खेळवला जाणार आहे. दोन्ही संघातील काही खेळाडू दुखापतीमुळे उपलब्ध नाहीत. त्यासोबतच दोन्ही संघ नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे या सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.


काही परदेशी खेळाडूंच्या उपलब्ध नाहीत, तसेच काही खेळाडू दुखापतग्रस्त आहेत, अशातच पंजाब किंग्स (Punjab Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) शनिवारी आयपीएल 2023 च्या आपल्या सलामीच्या सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे. आयपीएलची विजयी सुरुवात करण्याचं दोन्ही संघांचं लक्ष्य असेल. दरम्यान, पंजाब आणि कोलकाता दोन्ही संघांकडे तगडे खेळाडू आहेत, पण मैदानावरील त्यांची कामगिरी फारशी प्रभावी ठरलेली नाही. 


IPL 2023, PBKS vs KKR : दोन्ही संघ नव्या कर्णधारासह मैदानात
आजच्या सामन्यासाठी पंजाबचा संघ अनुभवी शिखर धवनच्या नेतृत्वात तर कोलकाताचा संघाची कमान नितीश राणाच्या हाती असेल. दोन्ही संघ नव्या नेतृत्वाखाली जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. पंजाब किंग्सचा आयपीएलच्या एकाही सीझनमध्ये विजय मिळवता आलेला नाही. त्याउलट राजस्थान संघाने याआधी गौतम गंभीरच्या नेतृत्वात दोन वेळा आयपीएलची ट्रॉफी कमावली आहे.


IPL 2023, PBKS vs KKR : कुणाचं पारड जड?
मोहालीच्या पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या (Punjab Cricket Association Stadium) आयएस बिंद्रा स्टेडियमवर (IS Bindra Stadium) आज दुपारी पंजाब (Punjab) आणि कोलकाला (Kolkata) संघ आमनेसामने असतील. दोन्ही संघांमधील मागील सामन्यांवर नजर टाकली तर हे संघ आळीपाळीने एकमेकांना पराभूत करत आहेत. गेल्या पाच सामन्यांपैकी केकेआरने तीन सामने जिंकले आहेत, तर पंजाब किंग्सने दोन सामने गमावले आहेत.  आजच्या सामन्यात पंजाब किंग्सचं पारड काहीसं जड असेल. याचं कारण म्हणजे पंजाब संघ घरच्या मैदानावर खेळणार आहे. तक दुसरीकडे, कोलकाता संघ आपला नियमित कर्णधार श्रेयस अय्यरशिवाय मैदानात उतरणार आहे. पाठीच्या दुखापतीमुळे श्रेयस अय्यर सध्या संघाबाहेर आहे. श्रेयस यानंतरच्या सामन्यामध्ये परतण्याची शक्यता आहे. सध्या केकेआरची कमान नितीश राणाच्या हाती आहे.


कशी आहे खेळपट्टी?


मोहालीची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल मानली जात आहे. येथील मैदान लहान असल्यामुळे येथे जास्त चौकार-षटकार मारले जातात. येथे झालेल्या सहा टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चा वेळा 200 हून अधिक धावसंख्या करण्यात आली होती. या मैदानावर नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा झाला. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.