PBKS vs DC, Pitch Report : आयपीएलमध्ये (IPL 2022) आज पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स (PBKS vs DC) हे दोन्ही संघ आमने-सामने येणार असून दोन्ही संघाना पुढील फेरीत एन्ट्रीसाठी आजचा विजय महत्त्वाची भूमिका निभावेल. यंदाच्या आयपीएलमध्ये दिल्लीने 12 पैकी 6 सामने जिंकत 12 गुण खिशात घातले आहेत. ते सध्या पाचव्या स्थानावर आहेत. तर पंजाबने देखील 12 पैकी 6 सामने जिंकत 12 गुण मिळवले असले तरी त्यांचा नेट-रनरेट कमी असल्यामुळे ते सातव्या स्थानावर आहेत. दोघांचीही पुढील फेरीत पोहोचण्याची शक्यता अधिक असली तरी आजचा विजय मिळवणं दोघांना अत्यंत महत्त्वाचं असेल.


आयपीएलमध्ये (Indian Premier League) आजवर पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स (Punjab Kings vs delhi capitals) हे संघ 26 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता दोन्ही संघानी अगदी चुरशीची टक्कर एकमेकांना दिली आहे. यात पंजाबनं केवळ एक सामना अधिक जिंकत 15 विजय मिळवले आहेत. तर दिल्लीने 14 सामन्यात विजय मिळवला आहे.


पंजाब विरुद्ध दिल्ली अशी असेल ड्रीम 11 (PBKS vs DC Best Dream 11)


विकेटकीपर- जॉनी बेअरस्टो, ऋषभ पंत


फलंदाज- डेव्हिड वॉर्नर, शिखर धवन, मयांक अगरवाल. 


ऑलराउंडर- रिषी धवन, मिचेल मार्श, लियाम लिव्हिंगस्टोन


गोलंदाज- कागिसो रबाडा, राहुल चहर, चेतन साकरिया 


कसा आहे पिच रिपोर्ट?


आजचा सामना नवी मुंबईतील डी.वाय. पाटील मैदानात पार पडणार आहे. दरम्यान आजचा सामना सायंकाळच्या सुमारास होणार असल्याने दुसऱ्यांदा गोलंदाजी करणाऱ्या संघाला दवाची अडचण येऊ शकते, त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी घेण्याची शक्यता अधिक आहे.


हे देखील वाचा-