IPL 2022: आयपीएलचा पंधरावा हंगाम शेवटच्या टप्प्यात आला आहे. येत्या 29 मे रोजी आयपीएल 2022 चा अंतिम सामना खेळला जाणार आहे. यंदाच्या हंगामात अनेक खेळाडूंनी दमदार प्रदर्शन करून सर्वांना प्रभावित केलं आहे. या यादीत असे काही खेळाडू आहेत, ज्यांच्यासाठी आयपीएलचा पंधरावा हंगाम कदाचित अखेरचा ठरू शकतो. यातील काही खेळाडूंनी दमदार कामगिरी करत वय म्हणजे फक्त आकडाचं असल्याचं दाखवून दिलं. या यादीत चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिक (Dinesh Karthik), गुजरात टायटन्सचा यष्टीरक्षक वृद्धिमान शाहा (Wriddhiman Saha) आणि रासस्थान रॉयलचा अष्टपैलू खेळाडू रवीचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) यांचा समावेश आहे. या खेळाडूंच्या प्रदर्शनावर एक नजर टाकुयात. 


महेंद्रसिंह धोनी
चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं यंदाच्या हंगामात 13 सामने खेळले आहेत. ज्यात 128. 75 च्या स्ट्राईक रेटनं आणि 34.33 च्या सरासरीनं त्यानं 206 धावा केल्या आहेत. यंदाच्या हंगामातील धोनीची 50 धावा सर्वोत्तम कामगिरी आहे. या हंगामात त्यानं आतापर्यंत 20 चौकार आणि 9 षटकार मारले आहेत. 


दिनेश कार्तिक
दिनेश कार्तिक रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज दिनेश कार्तिकसाठी यंदाचा हंगाम चागंला ठरला आहे. दिनेश कार्तिकनं यंदाच्या हंगामात आतापर्यंत 13 सामन्यात 57 च्या सरासरीनं आणि 192.57 च्या स्ट्राईक रेटनं 285 धावा केल्या आहेत. 


वृद्धिमान साहा 
गुजरात टायटन्सचा यष्टिरक्षक फलंदाज द्धिमान साहानं या हंगामात आतापर्यंत 8 सामन्यांत 281 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याच्या फलंदाजाची सरासरी 40.14 इतकी आहे. त्यानं आपल्या संघ गुजरात टायटन्सला अनेक सामन्यांमध्ये चांगली सुरुवात करून दिली आहे. त्याचबरोबर साहानं यंदाच्या हंगामात उत्कृष्ट यष्टीरक्षण केलं आहे. 


रवीचंद्रन अश्विन
राजस्थान रॉयल्सचा अष्टपैलू खेळाडू रवीचंद्रन अश्विननं आपल्या संघाच्या विजयात मोलाचा वाट उचलला आहे. या हंगामात त्यानं आतापर्यंत 13 सामन्यात 10 विकेट्स घेतल्या आहेत. ज्यात त्याचा इकोनॉमी रेट 7.15 इतका होता. तर, सरासरी 37.20 होती. या हंगामात त्याच्या नावावर एका अर्धशतकांची नोंद झाली आहे.


हे देखील वाचा-