IPL 2022 Marathi News : महिनाभरापासून मुंबईमध्ये आयपीएलचा रनसंग्राम सुरु आहे. यंदा आयपीएलमध्ये दहा संघ आहेत. लखनौ आणि गुजरात या दोन संघाची यंदा आयपीएलमध्ये एन्ट्री झाली, त्यामुळे एकूण दहा संघामध्ये रनसंग्राम सुरु आहे. कोरोना महामारीमुळे आयपीएलचे सर्व लीग सामने मुंबई आणि पुण्यातील मैदानावर खेळवण्यात येत आहेत. त्यामुळे दहा संघ महाराष्ट्रामध्ये मुक्कामी आहेत. या संघातील खेळाडू सोशल मीडियावर कार्यरत आहेत. कोलकात्याचा स्टार खेळाडू पॅट कमिन्स याने ट्वीट करत आपल्या मुंबईतील चाहत्यांना प्रश्न विचारलाय... मुंबईमध्ये आहे... आज रात्रीच्या जेवणात काय खाऊ...
पॅट कमिन्सच्या प्रश्नावर अनेक चाहत्यांनी भन्नाट उत्तरे दिली आहेत. काहींनी वडापाव, तर काही जणांनी सरदार पावभाजी खा.. असा सल्ला दिला आहे. एका चाहत्याने वडापाव खाऊन पाहा... असा सल्ला दिला...त्याल पॅट कमिन्सने उत्तर दिले आहे. प्रसिद्ध पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी पॅट कमिन्सला ताडदेवमधील सरदार पावभाजी, एक्स्ट्रा चीजसोबत खाण्याचा सल्ला दिला.... राजदीप सरदासाई यांच्या सल्ल्यावर पॅट कमिन्सने हिवाळ्यात ट्राय करायला हवी... असं उत्तर दिले. काह युजर्सनी चिकन मालवानी, मिसळ पाव, गुजराती थाळी, पानी पुरी खान्याचा सल्ला दिला... पॅट कमिन्सच्या या प्रश्नावर स्वीगीनेही रिप्लाय केलाय... गरमा गरम वडापाव आणि लसणाची चटनी अन् मिर्ची खा...तसेच आम पन्ना किंवा लिंबू पाणी प्या... असा सल्ला दिलाय..
पाहा कमिन्सटे ट्विट
कमिन्सला चाहत्यांनी दिलेला सल्ला....
गोलंदाजी खराब कामगिरी, फलंदाजीत प्रभावी -
यंदाच्या हंगामात पॅट कमिन्सला आपल्या गोलंदाजीत लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. कमिन्स महागडा ठरला, त्याला विकेटही घेण्यात अपयश आले. पण फलंदाजीत कमिन्सने दमदार कामगिरी केली आहे. मुंबईविरोधात कमिन्सने गेलेला सामना परत आणला. कमिन्सने 14 चेंडूत अर्धशतक झळकावत सामना फिरवला. पण गोलंदाजीत त्याला प्रभावी कामगिरी करता आली नाही. कमिन्सने 12 च्या इकॉनॉमीने चार सामन्यात चार विकेट घेतल्या आहेत.
हे देखील वाचा-