navjot singh sidhu on ms dhoni : "एम एस धोनीला कधीकाळी विजयाची गॅरंटी मानले जायचे. आता त्याला फलंदाजी करताना पाहून चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांच्या आशा मावळल्या आहेत. कधीकाळी त्याच्या जोरदार फटकेबाजीचे कोट्यावधी लोक चाहते होते. आता त्याची सुस्त फलंदाजी कुंभकर्णाची आठवण करुन देत आहे. चाहते धोनीच्या जिद्देला सलाम करायचे. मात्र, आता त्याची टुक टुक बॅटिंग पाहून वाटतं की तो जिंकण्यासाठी प्रयत्न देखील करत नाही", असं भारताचे माजी क्रिकेटर आणि समालोचक नवज्योत सिंग सिद्धू यांनी म्हटंलय. ते शनिवारी झालेल्या चेन्नईच्या सामन्यावेळी समालोचन करताना बोलत होते.
आयपीएल 2025 मध्ये शनिवारी (दि.6) चेन्नई सुपर किंग्ज (CSK) दिल्ली कॅपिटल्स (DC) आमने सामने होते. या सामन्यात चेन्नईला 25 धावांनी पराभव स्वीकारावा लागलाय. यावेळीही अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनी क्रीजवर असूनही चेन्नई सुपर किंग्ज संघ धावांचा पाठलाग करण्यात अपयशी ठरला. महेंद्रसिंग धोनी 26 चेंडूत 30 धावा करून नाबाद परतला, मात्र चेन्नई सुपर किंग्जच्या पराभवानंतर त्याला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले. चेन्नई सुपर किंग्जने पहिल्या चारपैकी तीन सामने गमावले आहेत. सध्या पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नईचा संघ 9 व्या स्थानावर आहे.
नवज्योतसिंग सिद्धू यांनी या सामन्यादरम्यान कॉमेंट्री बॉक्समधून अचानक महेंद्रसिंग धोनीवर अशी कॉमेंट केली, ज्याबाबत कोणी विचारही केला नसेल. चेन्नई सुपर किंग्जच्या डावाच्या 14व्या षटकात त्यांनी धोनीबाबत भाष्य केलं. या षटकात महेंद्रसिंग धोनीने दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज मोहित शर्माच्या फ्री-हिट चेंडूवर षटकार ठोकला. महेंद्रसिंग धोनीच्या अपयशानंतर नवज्योतसिंग सिद्धूने त्याला फसी क्रॅकर म्हटले. नवज्योत सिंग सिद्धूच्या या कॉमेंट्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या षटकात महेंद्रसिंग धोनीने दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज मोहित शर्माच्या फ्री-हिट चेंडूवर षटकार ठोकण्यात अपयशी ठरला. महेंद्रसिंग धोनीच्या अपयशानंतर नवज्योतसिंग सिद्धूने त्याला फुसका फटाका म्हटले. नवज्योत सिंग सिद्धूच्या या कॉमेंट्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
सलामीवीर साथीदारानेच दिला होता दगा, तिलकरत्न दिलशानच्या बायकोने उपुल थरंगाशी केलं होतं लग्न