rj mahvash : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहलसोबत स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी बसल्यानंतर आर जे महावश सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली. युजवेंद्र चहल सध्या त्याच्या वैयक्तिय आयुष्यात अडचणींचा सामना करतोय. त्याची पत्नी धनश्री हिने 4.75 कोटींची पोटगी घेत वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान, घटस्फोट होण्याच्या दरम्यान, चहल आणि आरे महावश एकत्र दिसल्याने त्यांच्या रिलेशनशिपची चर्चा सुरु झाली होती. तेव्हा पासून आरजे महावश प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. दरम्यान, आर जे महावशने खुलासे करत सर्व चर्चा थांबवल्या आहेत. तिने तिच्या जुन्या नात्याबद्दल भाष्य केलंय.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आर जे महावशने तिच्या रिलेशनशिपबाबत भाष्य केलंय. ती म्हणाली की, मी कोणासोबतही रिलेशनशिपमध्ये नाही. मी सिंगल आहे. मी कोणासोबत सहज डेटसाठी जात नाही. मला लग्न करायचं असेल तरच मी एखाद्याला डेट करेन. सध्याच्या घडीला मला लग्नाची भीती वाटते. मी केवळ 19 वर्षांची होते, तेव्हा माझा साखरपुडा झाला होता.
आर जे महावशला एक दोन नव्हे तर तीनदा मिळाला धोका
आर जे महावश यांनी सांगितले की, छोट्या शहरातील असल्याने एक चांगला मुलगा शोधून त्याच्याशी लग्न करणे हाच माझा उद्देश होता आणि तिने तेच केले होते. पण महवेशला तिचा साखरपुडा मोडावा लागला. कारण तिच्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडने तिची एकदा नव्हे तर तीनदा फसवणूक केली. त्याच मुलाखतीत तिने सांगितले की, पहिल्या दोनदा ती गप्प राहिली, तिला असे वाटले की लोक तिच्याबद्दल वाईट बोलतील, पण प्रत्येक गोष्ट सहन करण्याची एक मर्यादा असते. तिसऱ्यांदा फसवणूक झाल्यावर ही मर्यादा ओलांडली गेली.
बदनामी होईल म्हणून गप्प राहिली आर जे महावश
आर जे महावश म्हणाली, 'पहिल्या दोन वेळेस फसवणूक झालेली असताना बदनामी होईल या विचाराने मी गप्प राहिले. पण कोणी किती सहन करू शकतो?' त्यामुळे त्याला गंभीर पॅनीक अटॅक आला होता आणि त्यासाठी त्याला इंजेक्शन्सही घ्यावी लागली होती.तिने पुढे बोलताना सांगितले की, डॉक्टर तिच्या आई-वडिलांना तिला काय झाले हे विचारायचे पण ती त्यांच्याशी शेअरही करू शकली नाही. कारण ती त्या मुलाशी लग्न करण्यासाठी तिच्या पालकांशी भांडत होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या
सलामीवीर साथीदारानेच दिला होता दगा, तिलकरत्न दिलशानच्या बायकोने उपुल थरंगाशी केलं होतं लग्न