Upul Tharanga got married to Tillakaratne Dilshan ex wife : क्रिकेट विश्वात आजवर अशी अनेक उदाहरणे पाहायला मिळाली आहेत, जिथे एका मित्रानेच दुसऱ्या मित्राला दगा दिलाय. क्रिकेट विश्वात दगा देण्याबाबतचा मुद्दा चर्चेत येतो तेव्हा सर्वांना भारतीय क्रिकेटपूट मुरली विजय आणि दिनेश कार्तिक यांची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. भारताचा माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिकच्या पत्नीने मुरली विजय सोबत अफेअर केलं आणि त्याच्यासोबत विवाह देखील केला होता. दरम्यान, असाच प्रकार श्रीलकेच्या दोन क्रिकेटपटूंमध्ये घडला होता. 

श्रीलंकेसाठी उपुल थरंगा आणि तिलकरत्न दिलशान सलामीला यायचे. दोघांनी एकत्र फलंदाजी करत श्रीलंकेला अनेक सामने जिंकवून दिले. दोघेही चौकार आणि षटकार मारण्यात तरबेज होते. दोघांमध्ये घट्ट मैत्री होती. मात्र, या मैत्रीत नंतरच्या काळात टोकाचा दुरावा निर्माण झाला. कारण उपुल थरंगाने तिलकरत्न दिलशानची बायको पटवली आणि तिच्याशी विवाह केला. 

मीडियात असे अनेक किस्से  ऐकायला मिळतात, ज्यामध्ये एका मित्राने त्याच्या जिवलग मित्राच्या पत्नीशी जवळीक साधल्यानंतर तिच्याशी लग्न केले. श्रीलंकन क्रिकेट संघाचा माजी कर्णधार उपुल थरंगा त्याचा सहकारी सहकारी क्रिकेटपटू तिलकरत्ने दिलशानच्या पत्नीच्या प्रेमात पडला होता. तिलकरत्न दिलशानने निलंका विथानगे हिच्याशी विवाह केला होता. मात्र, त्यांचं हे नात फार काळ टिकलं नाही. कारण त्यांच्या नात्यात उपुल थरंगाने एन्ट्री घेतली आणि सर्व काही फिस्कटलं. 

दिलशानसोबतचे संबंध चांगले चालत नसताना उपुल आणि निलंका यांच्यात जवळीक वाढली. दिलशान आणि उपुल श्रीलंकेसाठी एकत्र खेळायचे आणि ते चांगले मित्र होते, त्यामुळे थरंगा त्याच्या घरी वारंवार येत असायचा. हा खेळाडू पत्नी निलंका हिला भेटण्यासाठी त्याच्या मित्राच्या घरी जात होता. ही गोष्ट जेव्हा दिलशानला समजली तेव्हा तो संतापला आणि त्याने लगेच पत्नीला घटस्फोट दिला.

2011 चा विश्वचषक भारतात खेळवण्यात आला होता. 2011 मध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकात भारताने श्रीलंकेचा पराभव करून हे विजेतेपद पटकावले होते. तिलकरत्ने दिलशान आणि उपुल थरंगा अंतिम फेरीत पोहोचलेल्या संघात खेळले होते. हे दोघेही श्रीलंकेच्या संघासाठी सलमीवीर म्हणून मैदानात उतरत असायचे. भारताविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात थरंगाला केवळ 2 धावा करता आल्या, तर दिलशानने 33 धावांची खेळी केली.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Jofra Archer Sleeping : Live सामन्यात जोफ्रा आर्चर अंगावर ब्लँकेट घेऊन ढाराढूर झोपला; जाग आल्यानंतर पहिल्याच चेंडूवर केल्या पंजाबच्या दांड्या गुल, Video