Virat Kohli Vs Naveen Ul Haq : आरसीबी आणि लखनौ यांच्यातील सामन्यादरम्यान विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात बाचाबाची झाली होती. सामन्यादरम्यान झालेला वाद सामन्यानंतरही झाला होता. हातमिळवणी करताना विराट कोहली आणि नवीन यांच्यात पुन्हा बाचाबाची झाली होती. या वादात गौतम गंभीर यानेही उडी घेतली होती. या वादानंतर सोशल मीडियावर विराट कोहली आणि गौतम गंभीर यांचे चाहते एकमेंकांना भिडले होते. हैदराबाद, चेन्नई यांच्याविरोधातील सामन्यादरम्यान लखनौच्या गौतम गंभीर याला विराट कोहलीच्या चाहत्यांनी डिवचले होते. आता नवीन उल हक याला चाहत्यांनी डिवचलेय. 


मुंबईविरोधातील सामन्यादरम्यान फिल्डिंगसाठी नवीन सीमारेषावर उभा होता. त्यावेळी प्रेक्षकांनी विराट कोहलीच्या नावाने घोषणा दिल्या. मुंबईची फलंदाजी सुरु असताना नवीन सीमारेषावर फिल्डिंग करत होता. त्यावेळी चाहत्यांनी त्याला डिवचले. त्यानंतर नवीन उल हकने दिलेली रिअॅक्शन चर्चेचा विषय आहे. नवीन उल हक याने हाताने आणखी कोहली कोहली आवाज द्या... अशीच रिअॅक्शन दिली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होतोय. 


नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा विराट आणि नवीन उल हक यांचे मिम्स शेअर केले आहेत. सोशल मीडियावर नवीन आणि विराट यांचा वाद पुन्हा एकदा चर्चेत आहे. आयपीएलच्या सोळाव्या हंगामात आरसीबी आणि लखनौ यांच्या दोन्ही सामन्यात राडा झाला होता. लखनौने आरसीबीला त्यांच्याच मैदानावर पराभूत केले होते..त्यानंतर आवेश खान, गौतम गंभीर यांच्यासह इतर खेळाडूंनी जल्लोष केला होता. दुसऱ्या पर्वात आरसीबीने लखनौला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करत हिशोब चुकता केला होता. या सामन्यात विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात मैदानावर राडा झाला होता.. त्यानंतर सामना झाल्यानंतर गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात बाचाबाची झाली होती. लखनौ आणि आरसीबी यांच्यातील सामना याच कारणामुळे चर्चेत राहिला. सामन्यानंतर सोशल मीडियावरही अद्याप चढाओढ सुरुच होती. कधी विराट कोहली तर कधी नवीन अन् कधी लखनौ संघ कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत होते. विराट कोहलीचे चाहतेही यामध्ये सामील झाले. नवीन उल हक याच्यासमोर चाहत्यांनी कोहली कोहलीचे नारे दिलेत..