IPL 2023 Pitch Report: इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) मध्ये आजचा सामना पंजाब किंग्स (Punjab Kings) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात होणार आहे. या सीझनमधील दोन्ही संघांचा हा दुसरा सामना असेल. पहिल्या टप्प्यातील सामन्यात या दोन संघांमध्ये दिल्लीच्या मैदानावर सामना झाला, ज्यात पाहुण्या पंजाब किंग्ज संघानं दिल्ली कॅपिटल्सचा त्यांच्याच घरात 31 धावांनी पराभव केला. दिल्ली कॅपिटल्स संघ पॉईंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर आहे, याचा अर्थ ते प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडले आहेत.
आयपीएलच्या चालू हंगामात, दिल्ली कॅपिटल्स संघानं आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत आणि यावेळी त्यांना फक्त 4 सामने जिंकता आले आणि 8 सामने गमावले. त्यांचे केवळ 8 गुण आहेत आणि ते पॉईंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर आहेत. पंजाब किंग्जबद्दल बोलायचं तर शिखर धवनच्या नेतृत्वाखालील संघानं आतापर्यंत 12 सामन्यांत 6 सामने जिंकले आहेत आणि 6 सामने गमावले आहेत, ते 12 गुणांसह आठव्या क्रमांकावर आहेत. अशा स्थितीत पंजाब किंग्जला प्लेऑफसाठी अंतिम चारमध्ये आपला दावा ठोकण्याची संधी आहे. पण दिल्लीचा संघ त्यांना हरवू शकतो आणि त्यांना सोबत घेऊन बुडूही शकतो. दिल्लीचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडला आहे. पण पंजाबला प्लेऑफमध्ये एन्ट्री घ्यायची असेल तर सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. जाणून घेऊया, या सामन्याचा खेळपट्टीचा अहवाल कसा असेल?
कसा असेल खेळपट्टीचा अहवाल?
आज, पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना धर्मशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सीझनमध्ये आतापर्यंत धर्मशालामध्ये एकही सामना खेळला गेला नाही. बर्फाच्छादित टेकड्यांनी वेढलेल्या या सुंदर क्रिकेट स्टेडियमच्या खेळपट्टीबद्दल बोलायचं तर, इथे फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठी नक्कीच सोयीस्कर असेल. पण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या सीझनमध्ये आतापर्यंत इथे एकही सामना झालेला नाही, त्यामुळे येथील खेळपट्टीवर खेळण्यासाठी दोन्ही संघांची कसोटी लागणार एवढं मात्र नक्की. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही संघांमधील स्पिनर्स महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
पंजाबला प्ले ऑफमध्ये क्लॉलिफाय करण्याची संधी
पंजाब आपला 13वा साखळी सामना खेळणार आहे. 12 सामन्यांत 6 सामने जिंकल्यानंतर पंजाब 12 गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे. पंजाब आपले दोन्ही सामने जिंकून प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतो. मात्र, दोन्ही सामने जिंकूनही संघाला इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावं लागणार आहे. तसेच, संघाचा नेट रनरेट (-0.268) देखील खूप खराब आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
PBKS vs DC Match Preview: दिल्ली अन् पंजाबमध्ये कोणाचं पारडं जड? जाणून घ्या, आकडेवारी