IPL 2022, LSG vs KKR : आजची लढत लखनौ विरुद्ध कोलकाता; कधी, कुठे पाहाल सामना?

IPL 2022 : आज पुण्याच्या एमसीए मैदानात लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या संघामध्ये सामना पार पडणार आहे.

Continues below advertisement

LSG vs KKR : आज आयपीएलमध्ये (IPL 2022) यंदाच्या हंगामातील 53 वा सामना  लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (lucknow supergiants vs kolkata knight riders) या संघामध्ये पार पडणार आहे. लखनौ सुपरजायंट्स संघाने यंदाच्या हंगामात केलेल्या दमदार कामगिरीमुळे आजचा सामना त्यांनी जिंकल्यास त्यांच पुढील फेरीत पोहोचणं जवळपास निश्चित होईल. गुणतालिकेचा विचार करता लखनौने 10 पैकी 7 सामने जिंकत 14 गुणांसह दुसरं स्थान मिळवलं आहे. तर दुसरीकडे कोलकाता संघाने 10 पैकी 4 सामने जिंकल्याने 8 गुणांसह आठव्या स्थानी आहेत. 

Continues below advertisement

कोलकात्याची पुढील फेरीत पोहोचण्याची शक्यता अधिक नसली तरी आज होणाऱ्या लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (LSG vs KKR) या सामन्यात दोन्ही संघाकडून विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले जाणार यात शंका नाही. तर आजचा हा सामना कधी आणि कुठे पाहू शकता, याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

कधी आहे सामना?

आज 7 मे रोजी होणारा लखनौ सुपरजायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 7 वाजता नाणेफेक होईल.  

कुठे आहे सामना?

हा सामना पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

कुठे पाहता येणार सामना?  

लखनौ सुपरजायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आजचा सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल. 

हे देखील वाचा- 

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola