Mumbai Indians, IPL : आयपीएलमधील सर्वात यशस्वी मुंबई इंडियन्सला यंदाच्या हंगामात आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. पाच वेळा आयपीएल चषक जिंकणाऱ्या मुंबईला यंदाच्या हंगामात नऊ परभवाचा सामना करावा लागलाय. आयपीएलच्या इतिहासात मुंबईची सर्वात खराब कामगिरी आहे. याआधी 2009 आणि 2018 मध्ये मुंबईच्या संघाला प्रत्येकी आठ- आठ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. यंदाच्या हंगामात मुंबईचा नऊ सामन्यात पराभव झालाय. मुंबईने आपलाच नकोसा विक्रम मोडलाय. 


IPL 2009 मध्ये काय झाले होते?
आयपीएलच्या रनसंग्रामाला सुरुवात झाल्यानंतर दुसऱ्याच हंगामात मुंबईची खराब कामगिरी झाली होती. या हंगामात मुंबईने 14 पैकी आठ सामने गमावले होते. 2009 मध्ये मुंबईचा संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर पोहचला होता. या हंगामात पहिल्या 11 सामन्यात पाच विजय मिळवून मुंबईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीत होता. पण अखेरच्या काही सामन्यात पराभव झाल्यामुळे मुंबईचे आव्हान संपुष्टात आले होते. 
 
IPL 2018 : दुसरी सर्वात खराब कामगिरी - 
2009 नंतर 2008 मध्ये मुंबईने पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी केली. या हंगामात मुंबईला 8 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. सहा सामन्यात विजय मिळून 12 गुणांसह मुंबईचा संघ गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर होता. अखेरच्या लीग सामन्यात पराभव झाल्यामुळे मुंबईचा संघ प्लेऑफमधून बाहेर गेला होता...  


2022 - तिसरी खराब कामगिरी - 
2009 आणि 2018 नंतर मुंबईची 2022 मध्ये सर्वात खराब कामगिरी झाली. यंदाच्या हंगामात मुंबईला लागोपाठ 8 सामन्यात पराभव झाला होता. त्यानंतर दोन सामन्यात विजय मिळवला.. त्यानंतर कोलकात्याविरोधात पुन्हा एकदा मुंबईचा पराभव झाला..मुंबईचा यंदाच्या हंगामातील हा नववा पराभव होता.. आयपीएलच्या इतिहासात एका हंगामात मुंबईचे आतापर्यंत कधीच नऊ पराभव झाले नव्हते... हा नकोसा विक्रमही मुंबईच्या नावावर जमा झालाय. 


सर्वात यशस्वी संघाची लाजिरवाणी कामगिरी -
मुंबई इंडियन्स आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहे. मुंबईने 2013 मध्ये पहिल्यांदा चषकावर नाव कोरले होते. त्यानंतर  2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये ते चॅम्पियन झाले होते. मुंबईने आतापर्यंत पाच वेळा आयपीएल चषकावर नाव कोरले.... मुंबईनंतर चेन्नई आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहे. चेन्नईने चार वेळा चषकावर नाव कोरलेय.