Sunil Gavaskar On LSG: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात गुजरात टायटन्सनं दमदार कामगिरी करून दाखवली आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरातच्या संघानं आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत. त्यापैकी 8 सामन्यात त्यानं विजय मिळवला. तर, तीन सामने गमावले आहेत. गुजरात टायटन्सच्या प्रदर्शनावर भारताचा माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर खूश झाले आहेत. तसेच त्यांनी गुजरातच्या विजयामागचं नेमकं कारण काय? यावरही भाष्य केलं आहे. आज गुजरात आणि लखनौ यांच्यात मोठी लढत पाहायला मिळणार आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवून प्लेऑफमधील स्थान निश्चित करण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरणार आहेत. 


सुनील गावस्कर काय म्हणाले?
दरम्यान, स्टार स्पोर्ट्सचा कार्यक्रम क्रिकेट लाईव्हशी बोलताना सुनील गावस्कर म्हणाले की, गुजरातचा संघ कोणतीही भिती किंवा दबावाखाली क्रिकेट खेळताना दिसत नाहीये. गुजरात टायटन्स जिंकत आहेत कारण ते जगाची भीती न बाळगता खेळत आहेत. तुम्हाला जिंकण्याची इच्छा आहे. पण पराभवाचा अर्थ असा नाही की जगाचा अंत झाला आहे. गुजरातचा संघ त्यांच्या खेळाचा आनंद घेत आहेत आणि सकारात्मक क्रिकेट खेळत आहेत."


हरभजन सिंहचा गुजरातला पाठिंबा
भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंहनं गुजरातच्या संघाला पाठिंबा दर्शवला आहे. लखनौच्या संघाला पराभूत करून गुजरातचा संघ आयपीएल 2022 मध्ये प्लेऑफमध्ये पोहचणारा पहिला संघ ठरेल. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातचा संघ चांगली कामगिरी करत आहे. तसेच आशिष नेहराच्या मार्गदर्शनामुळं संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. गुजरातला पराभूत करणं इतर संघाला कठीण ठरत आहे. 


गुजरातसाठी मेथ्यू हेडनचं मोठं वक्तव्य
आयपीएलचा पहिलाच हंगाम खेळणाऱ्या गुजरातच्या संघानं क्रिडाविश्वावर छाप सोडली आहे. गुजरातच्या संघाची फलंदाजी मजबूत आहे.  राहुल तेवतियाची फलंदाजी पाहण्यासाठी प्रत्येकजण उस्तुक असतो. राशीद खानंही चांगली फलंदाजी करतो. राशीद खान नंतर डेव्हिड मिलरचा शो सुरू होतो. गुजरातच्या संघाची फलंदाजी आक्रमक आहे. ते खूप चांगल्या पद्धतीनं क्रिकेट खेळत आहेत. 


हे देखील वाचा-