आयपीएल 2020 साठीच्या तयारीसाठी प्रत्येक संघाने तयारीला सुरुवात केली होती. प्रत्येक जण मैदानात कसून सराव करताना दिसून आला. यावेळी धोनेही आयपीएलसाठी कसून सरावाला सुरुवात केली. नेट्समध्ये सराव करताना धोनी षटकार आणि चौकार मारत असत. धोनीला पुन्हा एकदा सराव करताना पाहून चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. यावेळी गेल्या 10वर्षात पहिल्यांदाच धोनीला एवढ्या एकाग्रतेने सराव करताना पाहिल्याचं चेन्नई संघाच्या फिजिओंनी सांगितलं. पण कोरोमुळे धोनीने चेन्नईला रामाराम करत धोनीला रांचीला परतावं लागलं.
धोनीने यंदा आयपीएलसाठी कसून मेहनत केली होती. गेल्या 10 वर्षांत धोनी पहिल्यादांच एवढे परिश्रम घेताला दिसून आला होता. गेल्या वर्षी चेन्नई संघात सामील झालेला चावलाने देखील धोनी सरावासाठी खूप मेहनत घेत असल्याचं सागितलं. तसेच सराव सामन्यातील फलंदाजीत धोनीचा सराव दिसून आल्याचं देखील बोलला.
आयपीएल रद्द झाल्यास धोनीला टी-२० विश्वचषकात संधी मिळणार?
विश्वचषक स्पर्धा आणि न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यातील धोनीचा संथ खेळ चर्चेचा विषय ठरला. यानंतर आतापर्यंत धोनी एकही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात खेळलेला नाही. भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आयपीएलमध्ये चांगला खेळ केल्यास धोनीचा टी-२० विश्वचषकासाठी अजुनही विचार केला जाऊ शकतो असं वक्तव्य केलं होतं. पण आयपीएलच होणार की नाही यात आता शंका असल्याने धोनीच्या कमबॅकवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर 29 मार्चपासून सुरु होणारी इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल 13चं आयोजन लांबणीवर पडलं होत. 29 मार्चपासून सुरु होणारी स्पर्धा आता 15 एप्रिलपासून सुरु होणार होती. पण आता लॉकडाऊनमुळे आता ती आशा देखील मावळली आहे.
दरम्यान याआधी दिल्ली सरकारने राज्यातील आयपीएल सामन्यांच्या आयोजनावर बंदी घातली होती. तर महाराष्ट्र सरकारने राज्यात आयपीएल तिकीटांच्या विक्री बंदी घालण्याची घोषणा केली होती.